IMPIMP

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

by bali123
Jayant Patil on Devendra Fadnavis | ncp leader jayant patil taunts bjp leader devendra fadnavis over babri demolition

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संभाषण रेकॉर्ड केल्याचे म्हटले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil यांनी फडणवीसांना सवाल केला.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील jayant patil बोलत होते. ते म्हणाले, ‘फोन टॅपिंग कधी केले जाते याचे काही नियम आहेत. हे टॅपिंग कोणाच्या परवानगीने झाले, त्याबाबत राज्य गुप्तवार्ता विभाग यांना याचे अधिकार असतात. रश्मी शुक्ला या आयुक्त असताना त्यांनी माहिती कशी गोळा केली? त्यांना भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम कसे करावे लागले? हे सर्व समोर आले आहे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी यंत्रणेचा गैरवापर कसा केला हे सर्व उघड झाले आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे’.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

लोकांचे संभाषण रेकॉर्ड करणं हा अधिकार यांना कोणी दिला. या बाबतीतले संकेत पायदळी तुडवून रेकॉर्डिंग करणे हा अधिकार कोणी दिला?, असा सवालही त्यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले, ‘पोलिसांच्या बदल्यांसाठी आस्थापना मंडळ असते. आस्थापना मंडळ शिफारशी करते त्याप्रमाणे बदल्या होत असतात. त्यांनी शिफारशी केल्याप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत’.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts