IMPIMP

‘राज्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत, हा नव्याने सापडलेला कोरोनाचा ‘वाझे स्ट्रेन’ तर नाही ना ?’

by bali123
nitesh rane uddhav thackeray sachin vaze strain covid

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात होत असताना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सामान्य नागरिकांसह महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. परंतु राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी सचिव वर्गाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.या सर्व गोंधळामध्ये आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला खोचक सवाल विचारला आहे.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

नितेश राणे यांनी ट्विट करुन आपल्या मनातील शंका बोलून दाखवली आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नितेश राणे यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यातच आता त्यांनी वाढत्या रुग्णसंख्येवरुन ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. नितेश राणे यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्येचा संबंध थेट वाझे प्रकरणाशी जोडला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

जेव्हा जेव्हा ठाकरे Uddhav Thackeray सरकार अडचणीत आले आहे तेव्हा तेव्हा त्यांनी कोरोनाचे आकडे वाढवले आहेत. सचिन वाझे प्रकरण समोर आल्यानंतर लगेच कोरोनाचे आकडे वाढण्यास सुरुवात झाली. हे आकडे फक्त महाराष्ट्रात वाढत आहेत. देशात वाढत नाहीत. त्यामुळे याची चौकशी होणे गरजेचे आहे. खरंच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत की स्वत:च्या चुका लपवण्यासाठी या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि लॉकडाऊनच्या धमक्या दिल्या जात आहेत. याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी यापूर्वी केली होती. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन राज्य सरकारच्या कामावर शंका व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली शंका व्यक्त करताना म्हटले आहे की, 5 मार्चला मनसुख हिरेनची हत्या झाली. त्यावेळी महाराष्ट्रात नवीन रुग्णसंख्या 8998 एवढी होती. 1 एप्रिल रोजी ही संख्या 39 हजार 544 एवढी झाली. 5 मार्चनंतर रुग्णदुपटीचा वेग अचानक वाढला की काय ? हे आकडे खरंच योग्य पद्धतीने दिले आहेत ना ? की (कोरोनाच्या इतर स्ट्रेनप्रमाणे) हा नव्याने सापडलेला वाझे स्ट्रेन तर नाही ना ? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts