IMPIMP

Aadhaar PAN Link-KYC | 31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा 1 एप्रिलपासून व्हाल त्रस्त; जाणून घ्या कोणती

by nagesh
Aadhaar PAN Link-KYC | get these 5 things done before march 31 aadhar pan link bank account kyc update tax saving investments

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाAadhaar PAN Link – KYC | 31 मार्च हा केवळ आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस नसून अनेक आर्थिक कामांची अंतिम
मुदतही आहे. ही आर्थिक कामे वेळेत पूर्ण न झाल्यास पुढील आर्थिक वर्षात अडचणी येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच कामांबद्दल
सांगणार आहोत, जी 31 मार्च 2022 पूर्वी करणे आवश्यक आहे. (Aadhaar PAN Link-KYC)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1 – विलंबित किंवा सुधारित आयटीआर

जर तुम्ही अद्याप 2021 – 22 च्या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरला नसेल, तर तो 31 मार्चपर्यंत भरता येईल. तसेच, सुधारित आयटीआर
देखील या तारखेपर्यंत दाखल करता येईल. (Aadhaar PAN Link – KYC)

 

2 – आधार – पॅन लिंक (Aadhaar PAN Link)

आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही अद्याप तसे केले नसेल, तर तुम्ही 31 मार्चपूर्वी आधार आणि पॅन
लिंक करू शकता. असे न केल्यास पॅन क्रमांक अवैध होईल.

 

3 – बँक खाते केवायसी अपडेट (Bank Account KYC Update)

यापूर्वी बँक खाते केवायसी अपडेट करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 होती. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट पाहता, आरबीआयने केवायसी अपडेट
करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4 – आगाऊ कर हप्ता

प्राप्तीकर कायद्याच्या कलम 208 अंतर्गत, 10 हजार रु. पेक्षा जास्त प्राप्तीकर दायित्व असलेल्या करदात्याला आगाऊ कर भरता येतो. तो चार हप्त्यांमध्ये भरता येतो. शेवटचा हप्ता 15 मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे.

 

5 – कर बचत गुंतवणूक (Tax Saving Investment)

प्राप्तीकर टाळण्यासाठी करदात्याने बचतीमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
ही गुंतवणूक मूल्यमापन वर्ष संपण्यापूर्वी केली पाहिजे.
अशा स्थितीत, जर तुम्हाला कर – बचत योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर 31 मार्चपूर्वी करा.

 

Web Title :- Aadhaar PAN Link-KYC | get these 5 things done before march 31 aadhar pan link bank account kyc update tax saving investments

 

हे देखील वाचा :

Shane Warne Passes Away | ऑस्ट्रेलियाचा महान फीरकीपटू शेन वॉर्नचं हदयविकाराच्या झटक्याने निधन

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

Aba Bagul | ‘पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ इ लर्निंगमधील विद्यार्थी अमेरिकेत शैक्षणिक एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत जाणार’

 

Related Posts