IMPIMP

Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे, जाणून घ्या पद्धत

by bali123
Pune Crime | Advertising a flat for rent on a website is expensive; 1 lakh 38 thousand fraud of a young man in Lohgaon

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Cyber Fraud | सायबर गुन्हेगारांपासून सर्वसामान्य लोकांचा घामाचा पैसा वाचवण्यासाठी एक सिस्टम उभारण्यात आली आहे. तिचा वापर करणे खुप सोपे आहे. ऑनलाइन होणारी फसवणूक (Cyber Fraud) कशी टाळावी आणि जरी पैशांची फसवणूक झाली तर 24 तासाच्या आत पैसे खात्यात कसे येतील ते जाणून घेवूयात…

काय आहे सिस्टम

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (National Cyber Crime Reporting Portal) बनवले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एक वेबसाइट बनवण्यात आली आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाइट लिंकवर एक हेल्पलाइन नंबर दिला आहे. तो नंबर 155260 आहे, तो नोंदवून ठेवा, फोनबुकमध्ये सेव्ह करा.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडु आणि आंध्र प्रदेशचे लोक या नंबरवर सात दिवस कोणत्याही वेळी (दिवस-रात्र) कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. इतर राज्यातील लोक सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान फोन करून कम्प्लेंट करू शकतात.

तक्रार करताना हे लक्षात ठेवा-

– फ्रॉडची पूर्ण माहिती द्या.

– फ्रॉडची अचूक वेळ सांगा.

– बँकेचे नाव – पत्ता आणि ज्या बँक किंवा ई-वॉलेट (PhonePe, Google Pay, PatTM etc) मध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची पूर्ण माहिती.

– तुमच्या माहितीवर कारवाई होईल आणि पैसे लवकरात लवकर मिळतील.

व्हर्च्युअल असिस्टंट सुद्धा असेल

याच वेबसाइटवर एक व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे मदतीसाठी संगणकीकृत मदतनीस सुद्धा असेल. त्याचे नाव सायबर दोस्त (Cyber Dost) आहे. तुम्ही या मित्राच्या मदतीने सुद्धा तक्रार करू शकता.

कसे काम करेल हे सिस्टम

– जेव्हा तुम्ही 155260 वर कॉल करता तेव्हा तो कॉल सायबर क्राईमच्या कॉल सेंटरमध्ये जातो.

– तुमच्या फ्रॉडबाबत सर्व माहिती रेकॉर्ड केली जाते.

– तुमच्या माहितीच्या आधारावर ज्या बँक खात्यात पैसे पोहचले असतील, सायबर क्राईम ते अकाऊंट फ्रीज करते.

– तक्रार योग्य असेल तर गेलेले सर्व पैसे पुन्हा खात्यात येतील.

– पैसा परत टाकण्याची प्रक्रिया त्या बँकेकडून होईल, ज्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत.

पण सायबर गुन्हेगारांना फ्रॉडनंतर ताबडतोब पैसे काढले तर?

याबाबत सायबर क्राईमच्या दिल्ली शाखेने सांगितले की, या स्थितीत तुमची तक्रार तुमच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात पाठवली जाईल. मग पोलीस इतर प्रकरणांप्रमाणे आरोपींना पकडून पुढील कारवाई करतील.

हे लक्षात ठेवा –

– सायबर क्राईमनंतर ताबडतोब 115260 वर कॉल करा, उशीर करू नका.

– बँक अकाऊंटच्या डिटेल कुणालाही देऊ नका. ओटीपी शेयर करू नका.

– संशयास्पद कॉलरशी जास्तवेळ बोलू नका.

– फोनवर एखादी लिंक आली तर क्लिक करू नका.

Web Title :- Cyber Fraud victims will get money back within 24 hours

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी तर चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या

RBI Decision Dry ATMs | जर ATM मध्ये तुम्हाला मिळाली नाही कॅश तर ‘या’ नंबरवर करा फोन, RBI संबंधित बँकेकडून घेईल 10 हजारांचा दंड; जाणून घ्या

Rain in Maharashtra | आगामी 3 ते 4 तासात मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा 

Related Posts