IMPIMP

HDFC Bank Alert | अलर्ट ! एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची सूचना; आजपासून रविवार रात्रीपर्यंत बँकेच्या ‘या’ सेवा बंद राहणार

by nagesh
HDFC Bank | hdfc bank hikes interest rate on fixed deposit

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाHDFC Bank Alert | खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी एक महत्वाची माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सावधानतिच्या सूचना दिल्या आहेत. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना विकेंडमध्ये बँकिंग व्यवहारात काही समस्या (HDFC Bank Alert) येऊ शकतात. यामुळे बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, काही सेवा शनिवारी रात्रीपासून रविवार रात्री 10 वाजेपर्यंत बंद असणार आहे. डिजिटल बँकिंग सुविधा अपडेट करण्यासाठी या विकेंडला बँकेकडून मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे. याबाबत एचडीएफसी बँकेनं मेलद्वारे ग्राहकांना सूचना दिल्या आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

‘या’ सेवांवर होणार परिणाम –

HDFC बँक नेट बँकिंग (Net Banking) आणि मोबाइल बँकिंग (Mobile Banking) अ‍ॅप सेवा, डेबिट-क्रेडिट कार्ड (Debit Card and Credit Card) या संबंधित सेवा प्रभावित होतील.
अशावेळी ग्राहकाला या सेवांबाबत एखादे काम पूर्ण करायचे असेल तर आज संध्याकाळी 6 वाजण्याअगोदर याबाबत कामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
नाहीतर ग्राहकाला रविवार रात्री 10 वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

दरम्यान, HDFC बँकेनं अशी माहिती दिली आहे की, ‘तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय सर्वश्रेष्ठ डिजिटल बँकिंगचा अनुभव मिळावा या प्रयत्नासाठी आम्ही निर्धारित मेंटेनन्स प्रक्रिया करणार आहोत.
या प्रक्रियेदरम्यान, खालीलपैकी व्यवहार HDFC बँकेच्या Net Banking आणि Mobile Banking अ‍ॅपवर उपलब्ध नसतील.

 

 

– क्रेडिट कार्ड स्टेटमेंट पाहणे आणि डाउनलोड करणे –

7 ऑगस्ट 2021 संध्याकाळी 6 ते 8 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत

 

 

– डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित सेवा –

11 ऑगस्ट रात्री 12.30 वाजता ते सकाळी 6.20 वाजेपर्यंत

 

 

Web Title : hdfc bank alert to its customers net and mobile banking debit and credit card will be effected from today check timings here

 

हे देखील वाचा :

Tokyo Olympics 2020 | भारत आणि पाकिस्तानमध्ये सुवर्ण पदकासाठी होणार आज ‘झुंज’

High Court | वडिलांचेच नव्हे, आईचेही आडनाव वापरू शकतात मुले : दिल्ली उच्च न्यायालय

Earphone Burst | जुन्या गॅझेट्सचा वापर करत असाल तर रहा सावध, गाणे ऐकताना कानात फुटला ईयरफोन, तरूणाचा मृत्यू

 

Related Posts