IMPIMP

Pune Fire Brigade | जत्रेला कुटुंबासमवेत निघालेल्या अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य; बीएमडब्ल्युला लागलेली आग विझवण्याचा केला प्रयत्न (व्हिडीओ)

by nagesh
Pune Fire Brigade | Duty performed by a fireman who accompanied his family to the fair; Attempts to put out BMW fire (VIDEO)

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन– Pune Fire Brigade | कुटुंबासमवेत ते जत्रेला जात होते. त्याचवेळी त्यांना रस्त्यावर चारचाकी वाहनाने पेट घेतल्याचे
दिसले. जवळच्या पेट्रोल पंपावरील अग्निरोधक उपकरण वापरुन या आलिशान गाडीला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. (Pune Fire Brigade)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोंढवा खुर्द येथील अग्निशमन केंद्रातील (Fire Brigade Station, Kondhwa Khurd) कार्यरत आणि देवदूतचे जवान हर्षद येवले (Harshad Yewale) असे त्यांचे नाव आहे.

 

 

ही घटना उंड्री पिसोळी (Pune Crime News) येथील धर्मावत पेट्रोल पंपासमोर मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

 

कोंढव्यातील रहिवाशी हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासह सातारा रोडवरील केंजळ गाव येथील जत्रेला कारमधून निघाले होते. वाटेत एका वाहनाने मोठ्या  प्रमाणावर पेट घेतल्याचे दिसताच त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. धर्मावत  पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु या आलिशान गाडीची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  त्याचवेळी तिथे अग्निशमन वाहन पोहोचताच जवानांनी पाण्याचा मारा करुन आग पूर्ण विझविली. (Pune Fire Brigade)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अग्निशमन दलाचे कार्य पार पडताच उपस्थित नागरिकांनी व कुटुंबिय यांनी जवान हर्षद येवले व इतर जवानांचे कौतुक केले.

 

या कामगिरीत देवदूत जवान हर्षद येवले तसेच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबुराव जाधव, अक्षय खरात व तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पडये, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला.

 

 

Web Title :- Pune Fire Brigade | Duty performed by a fireman who accompanied his family to the fair; Attempts to put out BMW fire (VIDEO)

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | टिळक चौक : काळ्या काचांमुळे तोतया पोलिस जाळ्यात, सातारा जिल्हयातील ओमकार धर्माधिकारीला अटक

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

Pune Crime News | मार्केटयार्ड : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निलंबित प्रशासकाविरोधात विनयभंगासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Maharashtra Politics News | बाबरी शिवसैनिकांनीच पाडली, शिवसेनेच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं

 

Related Posts