IMPIMP

Kolhapur News : सोन्याचा भाव घसरला, 10 ग्रॅमचा दर 44 हजार 370, महिन्याभरातील सोन्याचा हा नीचांकी दर

by sikandershaikh
gold and silver price increased today while 11500 down from record highs check mcx rates

कोल्हापूर (kolhapur news) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)kolhapur news | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण सुरु आहे. 22 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 44 हजार 370 रुपयांवर आला आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 100 रुपयांवर आला आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याचे दर 830 रुपयांनी उतरले आहेत. गेल्या महिन्याभरातील सोन्याचा हा नीचांकी दर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सट्टा मार्केटमध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढली तेव्हा सोन्याचे भाव वधारले आहेत. सध्या प्रतिऔंस सोन्याचा दर कमी झाल्याने सोने स्वस्त होत आहे. सोन्यामध्ये होत असलेल्या घसरणीनंतर ग्राहकांसाठी खरेदीची योग्य संधी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दहा दिवसापूर्वी म्हणजेच दि. 8 व 9 फेब्रुवारीला सोने 600 ते 700 रुपयांनी उतरले. बुधवारी पुन्हा 350 रुपयांनी सोने स्वस्त झाले. चांदी दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी चांदी 1,030 रुपयांनी वाढली. चांदीचा प्रतिकिलो दर 71 हजार 770 वर गेला. दरम्यान, दरातील चढ-उतार सुरूच असून, ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे, असे कोल्हापूर जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी सांगितले.

Vastu : घरातील कोणत्या दिशेला असावी तिजोरी ? तुम्ही ‘ही’ चूक तर करत नाही ना !

Related Posts