IMPIMP

Facebook login करण्याअगोदर तुम्हाला करावे लागणार ‘हे’ काम

by bali123
FB Account Cloning | ratnagiri collector facebook account hacked demand for money from hackers

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – फेसबुकच्या एकूण युझर्सपैकी स्मार्टफोनवर फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जे युझर्स फोनवरून फेसबुक facebook वापरतात त्यांच्यासाठी फेसबुकने आता टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया बंधनकारक केली आहे. युझर्सच्या अकाउंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला . तसेच लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. फेसबुकने २०१७ मध्येच डेस्कटॉपवर लॉगिनसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया बंधनकारक केली आहे. आता ती प्रक्रिया मोबाइल युझर्ससाठीसुद्धा लागू करण्यात येणार आहे. आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्रकारच्या मोबाइलवर फेसबुक facebook वापरणाऱ्या युझर्सना टू फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रक्रिया बंधनकारक असणार आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा वेगळ्या किंवा नव्या मोबाइलवरून तुम्ही लॉगिन करणार असाल, तर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय तुमचे अकाउंट लॉगिन होणार नाही. सध्या फेसबुक अकाउंट हॅक होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे हे फीचर उपयुक्त असणार आहे.

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे काय?
टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे एक सिक्युरिटी फीचर हे आपल्या सोशल अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी वापरले जाते. यामध्ये तुम्ही नेहमी ज्या उपकरणावरून तुमचं फेसबुक अकाउंट वापरता, त्यापेक्षा वेगळ्या उपकरणावरून तुमच्या फेसबुक facebook अकाउंटला लॉगिन करण्याचा प्रयत्न झाला, की त्या वेळी लॉगिनसाठी केवळ पासवर्ड पुरेसा होत नाही. त्या वेळी ते अकाउंट तुम्हीच उघडत आहात, याची खात्री पटण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक एसएमएस पाठवला जातो किंवा तुमच्या नेहमीच्या उपकरणावर अलर्ट पाठवून ते तुम्हीच आहात का याची खात्री करण्यासाठी टॅप/क्लिक करायला सांगितले जाते.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे, तुमच्या अकाउंटचा पासवर्ड कोणाला कळला आणि त्या व्यक्तीने तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तरी तो त्यात यशस्वी होऊ शकणार नाही. कारण जर कोणी वेगळ्या उपकरणावरून लॉगिन करणार असल्याने त्याचं नोटिफिकेशन किंवा एसएमएस तुम्ही फेसबुक नेहमी ज्या उपकरणावरून वापरता त्या नंबरवर देण्यात येईल. त्यांनी जरी पासवर्ड टाकला तरी तो ऑथेंटिकेशन कोड टाकल्याशिवाय तुमचं अकाउंट सुरु होणार नाही. आणि जर कोणी तुमचं अकाउंट उघडण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन लगेच येईल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या अकाउंटचा पासवर्ड बदलू शकता.

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

‘आम्ही युझर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेकडे लक्ष देतो. युझर्सची अकाउंट्स हॅकर्सकडून हॅक केली जाऊ नयेत, यासाठी आमचा प्लॅटफॉर्म सुरक्षित असावा, याकरिता आम्ही असे उपाय राबवतो,’ अशी माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे. तसेच या आठवड्याच्या सुरुवातीला ट्विटरकडून सिक्युरिटी फीचरचा उपयोग केवळ ऑथेंटिकेशन प्रक्रियेच्या रूपात केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. ट्विटरवरील प्रत्येक अकाउंटमध्ये अनेक सिक्युरिटी कीजची परवानगी देण्यात येईल असे ट्विटरकडून जाहीर करण्यात आले आहे.

 

हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts