IMPIMP

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

by bali123
Allegations against Parambir Singh, former DGP Jaiswal in Sanjay Pandey's 'letter bomb' of disgruntled senior IPS officer; Excitement in the police force, a letter was written to Chief Minister Thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील प्रमुख पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यामध्ये पुन्हा एकदा डावलेले गेलेले आणि महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये बदली केलेले महासंचालक संजय पांडे Sanjay Pandey यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाराजीनामा पाठविला आहे. हे पत्र महाराष्ट्र पोलीस दलासाठी ‘लेटर बॉम्ब’ ठरले असून त्यातून अतिवरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये परस्पराविरुद्ध कसे हेवेदावे आहे, याचे उदाहरणच संजय पांडे यांनी दिले आहे.

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यावरील चौकशीत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी अडथळे आणल्याचा आरोप संजय पांडे यांनी या पत्रात केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, जेव्हा राज्य शासनाला देवेन भारती यांची चौकशी करायची होती, तेव्हा ती शासनाने माझ्याकडे सोपविली. त्याचे मी ३ अहवाल दिले असून मुख्यमंत्री आपण आणि शरद पवार यांनीही या चौकशीच्या कामाचे कौतुक केले होते.

‘परमबीर सिंह आणि वाझे यांचे BOSS कोण?’

देवेन भारती यांच्याविरुद्ध झालेल्या या चौकशीत मुंबई पोलीस आयुक्त आणि तत्कालीन पोलीस महासंचालक यांच्या असहकाराने कठोर अडथळे निर्माण झाले. परमबीर सिंह यांनी प्रत्यक्षदर्शींना धमकाविले. त्याची लेखी नोंद कामकाजात आहे. मुंबई पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत एकही कागदपत्रे दिली गेली नाहीत, हे मी अनेक वेळा शासनाला संदर्भ देऊनही कळविले आहे. त्यानंतर तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी दूरध्वनी करुन ही चौकशी थांबविण्याचे आदेश दिले. हे तुमच्याबरोबरच्या माझ्या वैयक्तिक बैठकीत मी तुमच्या लक्षात आणून दिले.

राष्ट्रवादीने केले CM उद्धव ठाकरेंचे समर्थन, म्हणाले – ‘वाझेंना सेवेत घेण्यासाठी फडणवीसांवर कोणाचाही दबाव नव्हता’

पिंपरी चिंचवडमध्ये फिनोलेक्स प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल गुन्हा नोंदवू देत नव्हते . ते बंद करण्याचे आदेश दिले होते. तेव्हा ते काम माझ्यावर सोपविले होते, असा दावा संजय पांडे यांनी केला. जयस्वाल यांच्या हल्ल्याला मी रोखले. तेव्हा त्यांनी मी पोलीस अधिकारीदेखील नाही, असे जाहीर वक्तव्य केले. विरोधकांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात त्याच धर्तीवर माझ्या विरोधात रिट याचिका दाखल केली. माझ्या चौकशीमुळे पुण्यात खटला दाखल झाला. या प्रकरणात गृहमंत्री वैयक्तिकरित्या लक्ष घालत होते. माझ्या माहितीनुसार त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले, असे संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या व व्हायरल झालेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्रावरुन राज्यातील अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर हेवेदावे आहेत याचे जाहीर प्रदर्शन झाले आहे. त्याची संपूर्ण पोलीस दलात चर्चा सुरु झाली आहे.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts