IMPIMP

जयंत पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘देशाची अर्थव्यवस्था ICU मध्ये, केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

by bali123
maharashtra minister jayant patil slams modi government over petrol diesel price hike no jobs

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देशाची अर्थव्यवस्था अद्याप स्थिर झालेली नाही. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता कॅबिनेटमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील jayant patil यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’, असा सवाल त्यांनी केला.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्राच्या Lockdown संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था यांसारख्या मुद्यांवर मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यावर जयंत पाटील यांनी #WorldSleepDay या हॅशटॅगखाली ट्विट केले. त्यामध्ये जयंत पाटील jayant patil यांनी म्हटले, की ‘शेतकरी आंदोलनात जवळपास 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. तरुण रोज नोकरी गमावत आहेत. दररोज पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरवाढ होत आहे. देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?’

नाराज असलेल्या वरिष्ठ IPS अधिकारी संजय पांडेंच्या ‘लेटर बॉम्ब’मध्ये परमबीर सिंह, माजी DGP जयस्वाल यांच्यावर आरोप; पोलीस दलात खळबळ, मुख्यमंत्री ठाकरेंना लिहीलं होतं पत्र

दरम्यान, जयंत पाटील यांच्याकडून मोदी सरकारकडून सातत्याने टीका केली जात आहे. यापूर्वी त्यांनी लसीकरणावरून टोला लगावला होता. भारतात लस नसली तरी चालेल पण परदेशात पाठवा असे केंद्राचे धोरण आहे. मात्र, आधी देशातील लोकांना कोरोनाची लस द्या आणि मग जगभरात पाठवा, असे पाटील यांनी म्हटले होते.

हेही वाचा

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

‘NIA ने उरी, पठाणकोट अन् पुलवामा हल्ल्यात काय तपास केला?’ संजय राऊतांची टीका

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

आघाडी सरकारच्या कारभाराची ‘लिटमस टेस्ट’ पंढरपुरच्या पोटनिवडणुकीत होणार !

‘फाटलेली जीन्स तरुणवर्ग सांभाळेल, मात्र फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?’ उर्मिला मातोंडकर यांची ‘त्या’ मुख्यमंत्र्यांवर टीका

आता ‘बेबो’ करिनादेखील बनणार ‘सीता’ !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीवर ‘कंगना राणौत’ने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सरकार जगन्नाथ मंदिराची 35 हजार एकर जमीन विकणार, ISKCON चे प्रवक्ते म्हणाले – ‘मूर्ख हिंदूंच्या उदासीनतेचा परिणाम’

‘… पण काही जण वडिलोपार्जित संपत्ती वाढवण्याऐवजी ती विकून घरखर्च भागवतात’ – राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

Related Posts