IMPIMP

Maharashtra Political Crisis | भाजपसोबत युती करण्यासाठी खासदारांचाही दबाव ? उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतर ‘या’ खासदाराचा गौप्यस्फोट

by nagesh
Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन  Maharashtra Political Crisis | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा निवडणूक रिंगणात आहेत. सुरूवातीपासून शिवसेना विरोधकांच्या बाजूने असली तरी शिवसेनेचे काही खासदार भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याच्या बाजूने असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसंदर्भात काल मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचे मत जाणून घेण्यात आले. या बैठकीसंदर्भात आज नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Maharashtra Political Crisis)

 

शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारांनीही भाजपसोबत युती करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणल्याची चर्चा आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. त्यामुळे नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही खासदारांनी पक्षप्रमुखांना केली, अशी माहिती नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. (Maharashtra Political Crisis)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पत्रकारांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी म्हटले की, युतीमध्ये असताना आलेले अनुभव आणि महाविकास आघाडीत आलेले अनुभव यात खूप फरक आहे. भाजप हा आपला नैसर्गिक मित्र पक्ष आहे. केंद्र आणि राज्य एकत्र नसल्याने प्रकल्प रखडले, असे आम्ही पक्षप्रमुखांना सांगितले.

 

18 जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा,
द्रौपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती होणार असतील तर आपण पाठिंबा द्यायला पाहिजे,
अशी मागणी खासदारांनी मातोश्री येथे झालेल्या बैठकीत केली, असे हेमंत गोडसे म्हणाले. त्यावर विचार करू असे उद्धवजी म्हणाले,
असे गोडसे यांनी सांगितले.

 

दरम्यान, विरोधीपक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा,
यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत अन्य काहीजण आग्रही आहेत.
तर काही खासदारांनी भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्याने पक्षात दोन मतप्रवाह झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत.
मात्र, याच बैठकीत भाजपासोबत युती करण्याचा आग्रह काही खासदारांनी केल्याचा गौप्यस्फोट हेमंत गोडसे यांनी केल्याने गोडसे यांच्याविषयी नवीनच चर्चा सुरू झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Maharashtra Political Crisis | shivsena mp hemant godse reaction on meeting with party chief uddhav thackeray at matoshree

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर शिशुसेना काढण्याच्या तयारीत – भाजप आमदार

Pune Crime | सुनेच्या आत्महत्या प्रकरणी आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्यासह पती आणि मुलाला अटक

Pune Crime | भाडे वसुल करुन मालकाला नोकरांनी लावला सव्वा कोटीला चुना

 

Related Posts