IMPIMP

Sanjay Raut | 2024 ला महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut reaction after election commission hearing on shivsena party name and bow and arrow sign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शिवसेनेचे (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना नुकताच कथित गोरेगाव पत्राचाळ भूखंड प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यांनी बाहेर आल्याबरोबर पक्षाच्या कामांना सुरुवात देखील केली आहे. 2024 ला पुन्हा एकदा महाविकास आघाडीचाच (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्री होईल, असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी बाहेर असो वा नसो, 2024 ला महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे. सध्या राज्यातील परिस्थिती अस्थिर आहे, असे राऊत यावेळी म्हणाले. आज संजय राऊत (Sanjay Raut) यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्यावर असे अनेक खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील. पण, आमची लढाई सुरु राहील. आणि 2024 ला आम्ही मुख्यमंत्री बसवू. मी बाहेर असेन, अथवा हे लोक मला पुन्हा तुरुंगात टाकतील. पण आम्ही लढा देणार आहोत, असे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

शिवसैनिकांवर (Shiv Sainik) झालेल्या हल्ल्यासंबंधी संजय राऊत यांना विचारण्यात आले.
यावेळी ते म्हणाले, शिवसैनिकांचे रक्त स्वस्त नाही. शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकाचे रक्त जर
का सांडविणार असाल, तर शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही, विरोधकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
शिवसैनिकांच्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब प्रत्येकाला गेल्या 50 वर्षात द्यावा लागला आहे.
आणि यापुढे पण द्यावा लागेल. ज्याने शिवसेनेचे रक्त सांडविण्याचा प्रयत्न केला, ते राजकारणातून,
जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यांचे फार काही चांगले झाले नाही.
सत्ताधाऱ्यांनी पारदर्शकपणे कामे करायला हवीत. सत्तेचा दुरुपयोग करण्याऱ्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागेल. आमच्यावर खोट्या करावाया होत राहतील, पण आम्ही देखील अन्यायाच्या विरोधात लढत राहू, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Sanjay Raut | whether i am out of jail or not by 2024 there will be chief minister of mahavikas aghadi says sanjay raut

 

हे देखील वाचा :

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांच्या जामिनाचा निकाल राखीव; काय होणार याकडे सर्वांची उत्सुकता

Maharashtra Politics | इथेही महाराष्ट्र एक नंबर; आजी माजी आमदार आणि खासदारांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या खटल्यांचा अहवाल

Delhi Crime | ‘डेक्सटर’ वेब सिरीज पाहून प्रियसीचे केले 35 तुकडे; वसईच्या श्रद्धा वालकरचे खून प्रकरण

 

Related Posts