IMPIMP

मोदी सरकारची प्रति लिटर पेट्रोलमागे 33 तर डिझेलमागे 32 रुपयांची कमाई, संसदेत दिली कबुली

by bali123
diesel price in pune breaches rs 100 mark petrol sells for rs 110.92

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाईन – पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे देशातील जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे मात्र केंद्र सरकारने पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या किंमतीवर घसघशीत जमा महसूल केल्याचे संसदेत सांगतिले आहे. मागील वर्षीच्या 6 मे पासून केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलवर 33 रुपये तर डिझेलवर 32 रुपयांचा कर लावला असून यात एक्साईज कर, सरचार्ज आणि सेस आदीचा समावेश आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या अबकारी कराचा वापर हा विकासकामांसाठी केला जात असल्याचे समर्थन अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे. तसेच केंद्र सरकारने इंधनाला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा कोणताही विचार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पेट्रोल Petrol आणि डिझेलच्या गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्याच्या दरम्यानच्या दरांशी तुलना केल्यास 6 मे 2020 पासून कालावधीमध्ये केंद्र सरकारला प्रति लिटर पेट्रोलमागे 23 रुपये तर डिझेलमागे 19 रुपये महसूल म्हणून मिळत असत. गेल्या वर्षी 1 जानेवारी ते 13 मार्च या दरम्यान प्रति लिटर पेट्रोलवर 20 रुपये तर डिझेलवर 16 रुपये इतका लावला होता. 6 मे 2020 पासून केंद्राने प्रति लिटर पेट्रोलवर 33 रुपये तर डिझेलवर 32 रुपयांचा कर लावला आहे. याचा अर्थ असा होतोय की 1 जानेवारी 2020 पासून सरकारने प्रति लिटर पेट्रोल मागे 13 रुपये आणि डिझेलमागे 16 रुपयांची वाढ केली आणि तेवढ्या प्रमाणात कर गोळा केला. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो.

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

Related Posts