IMPIMP

ममतादीदी हँट्रीक मारणार का ? विजयाचा अश्व रोखण्यासाठी भाजपने ‘कंबर’ कसली !

by sikandershaikh
mamata-banerjee-amit-shah

कोलकत्ता : amit shah | पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून हँट्रीक मारण्याचे स्वप्न तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आहे. परंतु, त्यांच्या विजयाचा अश्व रोखण्यासाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (amit shah) यांनी कंबर कसली आहे.

विधानसभेच्या 294 जागांसाठी मार्च ते एप्रिल अखेर आठ टप्प्यात मतदान होत आहे. ता. 2 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी, माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केला आहे. तृणमूलचे प्रमुख विरोधी काँग्रेस आणि डावे पक्ष राज्यात कमकुवत झाले आहेत.

दुसरीकडे निवडणुकीचे पारडे फिरविण्याची ताकद असलेले आणि भाजपचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा यांच्याशी ममता यांचा सामना आहे. ममता बॅनर्जी या 2011 पासून सत्तेवर आहेत. त्यावेळी त्यांनी स्वबळावर 294 पैकी 227 आणि 2016 मध्ये 294 पैकी 213 जागा जिंकून सत्ता मिळवली होती. त्यामुळे त्या राज्यात हँट्रीक करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या विजयाची घोडदौड रोखण्याचे भाजप समोर आव्हान आहे. ममता यांना पराभूत करण्यासाठी तृणमूलच्या अनेक बंडखोरांना हाताशी धरले आहे. हायटेक प्रचार, रॅली, मिरवणूक काढल्या आहेत. स्नेहभोजने तसेच ‘सोनार बांगला’ अशी साद घालून मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा लावला आहे.

सध्याचे पक्षीय बलाबल
तृणमूल काँग्रेस -219
काँग्रेस -23
डावे – 19
भाजप – 16
एकूण – 294

Related Posts