IMPIMP

शरद पवारांचा दिल्लीतून भाजपवर ‘निशाणा’, फडणवीसांनी केला ‘पलटवार’

by bali123
Nawab Malik | nawab malik drugs allegation devendra fadnavis should give evidence mumbai police instead sharad pawar

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपने या मुद्यावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यात घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर लगेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस devendra fadanvis यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस devendra fadanvis म्हणाले, आज शरद पवार यांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य वाटलं. पण मी त्यांना दोष देणार नाही. कारण ते या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. शरद पवार यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी ज्युलिओ रिबेरो साहेबांनी करावी. मग ते परमबीर सिंग यांची चौकशी करणार की संपूर्ण घटनेची ? तसेच ते वर्तमान गृहमंत्र्यांची चौकशी करणार का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

गृहखातं अनिल देशमुख चालवतात की अनिल परब ?

संजय राऊत यांनी आज पहिल्यांदा आत्मचिंतन केलं

परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात पवार साहेबांचा उल्लेख केला. त्यात चॅटचा उल्लेख आहे. तो ही ते सीपी पदावर असतानाचं ते चॅट आहे. त्यामुळे तो एकप्रकारे महत्त्वाचा पुरावा आहे.

रश्मी शुक्ला यांनी देखील डिजी असताना फोन कॉल ट्रेस करुन जो रिपोर्ट सादर केला, त्यावर पण कारवाई झाली नाही. त्या देखील केंद्रीय सेवेत गेल्या.

अँटिलिया प्रकरणात एपीआय वाझे यांच्या अटकेनंतर व परमबीर सिंग यांनी पत्रातून जो खुलासा केला तो धक्कादायक आहे. असा खुलासा करणारे परमबीर सिंग पहिलेच अधिकारी नाहीत. तर यापूर्वी सुबोध जैसवाल यांनी देखील बदल्यासंदर्भात असाच अहवाल दिला होता.

हेही वाचा

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

बारामतीत भाजपाने जाळला गृहमंत्र्यांचा पुतळा

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

Related Posts