IMPIMP

शरद पवारांनी ‘लेटर बॉम्ब’च्या ‘त्या’ कनेक्शन कडे वेधले लक्ष, म्हणाले…

by bali123
Devendra Fadnavis | NCP chief sharad pawar on no photos of amit shah on devendra fadanvis congratulatory banners in nagpur

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यामुळे देशमुख यांच्यासह ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी दिल्लीत आपली भूमिका मांडली.

राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील
शरद पवार sharad pawar यांनी सांगितले की, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सर्वांशी चर्चा करु आणि मगच निर्णय घेऊ. उद्यापर्यंत निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यापूर्वी सर्वांशी चर्चा करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांची बाजू जाणून घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही शरद पवार यांनी सांगितले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे उद्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

खा. संजय राऊतांचा सरकारला सल्ला, म्हणाले -‘सरकारमधील प्रत्येक घटकानं आत्मपरीक्षण करावं’

अन् पत्र बाहेर आलं
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या कारचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत असून याचा तपास एनआयए करीत आहे. या प्रकरणातील कार मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची चौकशी सरु आहे. या सर्व घडामोडी सरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आणि काही दिवसांनी लगेच परमबीर सिंग यांचे पत्र समोर आले. असे म्हणत शरद पवार यांनी लेटर बॉम्बच्या टायमिंगकडे लक्ष वेधलं.

तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी परमबीर सिंग यांचे पत्र – जयंत पाटील

मुंबई पोलिसांना 100 कोटींचे टार्गेट, शरद पवार हसले
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट वाझे यांना दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. तुम्हीही राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. खरचं असं काही टार्गेट मुंबई पोलिसांना असतं का ? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार हसले आणि म्हणाले, ते तुम्ही मला काय मुंबई पोलिसांच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा माजी अधिकाऱ्याला विचारलं तर ते देखील हसतील, असे पवार म्हणाले.

हेही वाचा

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘तलाश नए रास्तों की है…’ खा. संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

Sanjay Raut : ‘पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंहांच्या ‘त्या’ पत्रामुळे भाजप आक्रमक, गृहमंत्र्यांचा राजीनामा?

बारामतीत भाजपाने जाळला गृहमंत्र्यांचा पुतळा

Obesity Causes : ‘या’ 7 गोष्टीमुळं लठ्ठपणाचे शिकार होतात लोक, जाणून घ्या

Related Posts