IMPIMP

भाजप अन् राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा Lockdown ला विरोध? नेते म्हणाले – ‘पुन्हा लॉकडाऊन करुन लोकांना त्रास देऊ नका’

by bali123
congress sanjay nirupam coronavirus lockdown vaccination maharashtra government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे lockdown संकेत दिले आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याला विरोधी पक्ष भाजपने विरोध दर्शवला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील लॉकडाऊनला विरोध केला आहे. तसेच आनंद महिंद्रा यांच्यासह अनेक उद्योजकांनी लॉकडाऊन lockdown हा पर्याय नसल्याचे सांगत विरोध केला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना लॉकडाऊनवरुन संताप व्यक्त केला आहे.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

संजय निरुपम म्हणाले, राज्यात पुन्हा लॉकडाऊन lockdown करण्याचा विचार होत आहे त्याला आमचा विरोध आहे. चुकीचे नियोजन आहे. गेल्यावर्षी जो लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगार व्हावे लागले होते. कारखाने बंद झाले होते आणि व्यावसायावर याचा मोठा परिणाम झाला होता. मागील लॉकडाऊनमध्ये तब्बल सव्वा तीन कोटी लोक गरीब झाल्याचा रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे सांगत संजय निरुपम यांनी लॉकडाऊनला विरोध केला. मात्र, त्यांनी कडक निर्बंध लावण्याला समर्थन दर्शवले आहे.

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

मिशन टेस्टिंग बकवास आडिया
संजय निरुपम पुढे म्हणाले, सावधिगिरी बाळगणे आणि लसीकरण हे दोन पर्याय सध्या उपलब्ध आहे. मागील वर्षी लस उपलब्ध नव्हती. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र सुरु करून जास्तीत जास्त लसीकरण करावे. मिशन टेस्टिंग बकवास आडिया आहे. तुम्हीच चित्रपटगृहाच्या बाहेर आणि मॉलच्या बाहेर जे लोक येत आहेत त्यांना पकडता आणि जबरदस्तीने ट्रेस करता. त्यांच्याकडून 250 रुपये घेता. याऐवजी त्यांना लस द्या. जास्तीत जास्त लोकांना लस द्या पण लॉकडाऊन lockdown नको, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts