IMPIMP

‘क्लीनचिट द्यायला शरद पवार न्यायाधीश नाहीत’; पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा टोला

by bali123
girish bapat criticized sharad pawar said not judge give clean chit

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. मात्र, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सर्व आरोप खोडून काढत देशमुखांची पाठराखण केली आहे. त्यावर पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट girish bapat यांनी टोला लगावला. ‘क्लीनचिट द्यायला शरद पवार हे न्यायाधीश नाहीत’, असे बापट म्हणाले.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे राज्यातील राजकारण तापत आहे. त्यावर गिरीश बापट girish bapat म्हणाले, ‘एका डीजी रँकच्या अधिकाऱ्याने आरोप करणे हे गंभीर आहे. हे सरकार नालायक आहे. कुंपणच शेत खायला निघालंय, अशी परिस्थिती सध्या आहे. देशमुखांच्या सर्व क्लिप्स आल्यावर सर्व सत्य समोर येणार आहे. शरद पवार हे क्लीनटचिट द्यायला न्यायाधीश नाहीत’. तसेच ‘महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागले आहे. म्हणजे कूंपन शेत खायला लागली आहे आणि पाण्याला तहान लागली आहे’.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण…’

दरम्यान, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेले आहे. सरकार भ्रष्ट होत चालले आहे. ते काँग्रेसला लिंबू-टिंबू समजतात. काँग्रेसला गृहित धरले जात नाही. याची किंमत काँग्रेसला येत्या काळात चुकवावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.

सरकार किती खंबीर असल्याचं आता समजतंय
शरद पवार हे सरकार खंबीर असल्याचे सांगत असतात. मात्र, ते या प्रकरणातून सरकार किती खंबीर आहे, हे कळत आहे, असा टोलाही गिरीश बापट girish bapat यांनी लगावला.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

परमबीर सिंहांच्या पत्रामुळं गृहमंत्र्यांवर राजीनाम्याचा दबाव? शरद पवारांनी अजितदादांसह ‘या’ दिग्गज मंत्र्याला बोलावलं दिल्लीत

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Related Posts