IMPIMP

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

by Team Deccan Express
Nilesh Rane | bjp leader nilesh rane slams ex cm uddhav thackeray over sanjay pandey arrest by ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी राज्यातील ठाकरे सरकारने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. या काळात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लॉकडाऊनची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी विविध घटकांसाठी एक पॅकेजची घोषणा केली आहे. सरकारचे हे पॅकेज गरिबांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. आता माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे nilesh rane आणि आमदार नितेश राणे  यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

म्हणून शिवभोजन सेंटर सुरु राहणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या काळात शिवभोजन सेंटर सुरु राहणार असून शिवभोजन थाळी मोफत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवरुन निलेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. ‘शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात, पण इतरांचे रेस्टॉरंट बंद राहणार. घराबाहेर जाऊन पार्सल घ्या, कोरोना होणार नाही. रिक्षा टॅक्सित फिरु द्या पण तुम्ही फिरु नका. मुंबईच्या बिल्डरांना मदत करताना हजार कोटी पण गरिबांना मदत करताना पाचशे-हजार’ असे ट्विटमध्ये म्हणत राणे nilesh rane यांनी राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीका केली आहे.

लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली
राज्यात लॉकाडाऊनची घोषणा करताना राज्यातील गरीब वर्गाला महिनाभरासाठी प्रतिव्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदुळ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. काल ही घोषणा केल्यानंतर आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे भुजबळ यांनी केंद्राकडे मदतीची मागणी केली आहे. छगन भुजबळ यांच्या मागणीवरुन निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.

निलेश राणे nilesh rane म्हणाले, मंत्री छगन भुजबळांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना लिहिलेले पत्र बघा. 1 महिना गरिबांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहु व 2 किलो तांदुळ द्यायची घोषणा केली आणि लगेच केंद्राकडे भीकेची मागणी पण केली. उद्या पासून राज्याचे मंत्री 7.45 ची सोय पण केंद्राकडे मागतील, काय सांगता येत नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

चेक द ब्रेन, नितेश राणेंची टीका
राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने मुख्यमंत्र्यांनी ‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत कोरोनाची साखळी तोडण्याचं जनतेला आवाहन केले आहे. यावरुन भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. नितेश राणे nilesh rane यांनी ट्विट करुन म्हटले की, कोरोनाची साखळी तोडा नव्हे, तर तुमचा मेंदू तपासा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांना आता चांगलं वाटत असेल, असा टोला देखील लगावला आहे.

 

Read More : 

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

 

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

 

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

 

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

 

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

 

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts