IMPIMP

Pandharpur : अजितदादांची खेळी अन् मनसे प्रचारात ! पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचं पारडं जड; मनसेकडून राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा

by Team Deccan Express
mns supports ncp pandharpur election leaders landed campaign

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे pandharpur election राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहेत. पोटनिवडणूकीचा प्रचार शिगेला पोहचला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना रिंगणात उतरवले आहे. तर भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी देऊन भगीरथ भालके यांना सहानुभूतीच्या लाटेत तगडे आव्हान दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच दोन दिवसांचा पंढरपूर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शहरातील अनेक प्रतिष्ठित नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानीही अजित पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर मनसेने राष्ट्रवादीचे उमेदवर भगीरथ भालके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

गुजरात भाजप ऑफिसमधून रेमडेसिवीर इंजेक्शनचे मोफत वाटप, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मनसेने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना नुसता पाठिंबा दिला नाही तर त्यांच्या प्रचारही करत आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचं पारडं जड झालं आहे. अजित पवार यांनी आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात परिचारकांच्या नेत्यांच्या घरी भेट दिली. तसेच त्यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्याही घरी भेट दिली होती. या भेटी दरम्यान त्यांनी धोत्रेंच्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी गरज भासल्यास सांगा, प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन पवार यांनी धोत्रे यांना दिले. परंतु अजित पवार यांची भेट ही केवळ राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत करावी एवढीच होती. अजित पवार यांनी केलेली ही खेळी यशस्वी झाली अन् मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा देत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.

‘फडणवीसांच्या काळात 14 मंत्र्यांवर गंभीर आरोप होऊनही नैतिकतेनं सत्तेशी जणू ‘लव्ह जिहाद’ पुकारला होता’, संजय राऊतांचा टोला

दरम्यान, भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिल्याने या पोटनिवडणुकीत दोन साखर कारखानदारांमध्ये चुरशी लढाई होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीने मतदारसंघातील मोठा गट असलेल्या कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादीत घेत भाजपला धक्का दिला आहे. कल्याणराव काळे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. कल्याणराव काळे यांच्याकडे दोन कारखाने आणि ग्रामपंचायती असून त्यांचा जनसंपर्क दांडगा असून याचा फायदा राष्ट्रवादीला होणार आहे.

प्रकाश जावडेकरांच्या ‘ज्ञानामृता’ची महाराष्ट्राला गरज नाही, संजय राऊतांची टीका

पंढरपूर पोटनिवडणुकीतील उमेदवार
पंढरपूर विधानसाभा मतदारसंघासाठी pandharpur election छाननीत एकूण 30 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. यामध्ये भगीरथ भारत भालके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), समाधान महादेव अवताडे (भारतीय जनता पार्टी), शैला धनंजय गोडसे (बहुजन विकास आघाडी), सचिन अरुण शिंदे (स्वाभिमानी पक्ष), संजय नागनाथ माने (महाराष्ट्र विकास आघाडी), राजाराम कोंडीबा भोसले (बळीराजा पार्टी), सिद्धेश्वर भारत आवारे (बहुजन महापार्टी), बिराप्पा मधुकर मोटे (वंचित बहुजन आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष महादेव माने, संदीप जनार्दन खरात, नागेश प्रकाश पवार, अभिजीत वामनराव आवाडे-बिचकुले, सुनिल सुरेश गोरे, सिताराम मारुती सोनवले, सिद्धेश्वर बबन अवताडे, सुदर्शन रायचंद खंदारे, कपिलदेव शंकर कोळी, सुदर्शन पांडूरंग मसुरे, बिरुदेव सुखदेव पापरे हे 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Read More : 

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर
होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

Related Posts