IMPIMP

नाना पटोले संतापले, म्हणाले- ‘आमच्या टेकूवर ठाकरे सरकार’

by bali123
nana patole got angry after sanjay raut statement upa uddhav thackeray cm help congress

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या युपीएच्या वक्तव्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीए (UPA) चं नेतृत्व करावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं यावर नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, राऊत शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का. यावर पुन्हा भाष्य करत राऊत म्हणाले यूपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे. राज्य स्तरावरील, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये. यावर आता नाना पटोले Nana Patole  यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलंय असं ते म्हणाले आहेत. भिवंडीत ते बोलत होते.

Photos : सारा अली खाननं शेअर केली पोस्ट, म्हणाली – ‘आज काही काम नाहीये, म्हणून…’

‘ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलंय हे शिवसेनेनं लक्षात ठेवावं’
नाना पटोले Nana Patole  म्हणाले, संजय राऊत उठसूट काँग्रेसविरोधात बोलत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलंय हे शिवसेनेनं लक्षात ठेवावं असा थेट इशाराच त्यांनी यावेळी बोलताना दिला.

… म्हणून देवेंद्र फडणवीस घाबरलेत, नवाब मलिकांचा पलटवार

‘राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकिली बंद करावी, उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार तक्रार
इतकंच नाही तर राऊतांनी युपीएसाठी शरद पवारांची वकिली बंद करावी असंही त्यांनी बजावलं आहे. राऊत पवारांची वकिली करत आहेत त्यावरून राऊत राष्ट्रवादीत आहेत की, शिवसेनेत हे तपासावं लागेल असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे. लवकरच राऊतांची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Also Read : 

Chandrashekhar Bawankule : ‘एक मंत्री प्रचारात तर एक मंत्री खुर्ची वाचवण्यात व्यस्त, तीन मंत्र्यांनी नागपूरला वाऱ्यावर सोडलं’

 

भावी पोलिस अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत ‘डान्स पार्टी’

 

दिया मिर्झानं केलं Tweet ! पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल म्हणाली…

 

होय, दीपाली चव्हाणांना वाईट वागणूक मिळत होती, वन्यजीव रक्षकाचा दावा

 

Gold Rates Today : सोन्या चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या नवे दर

 

वाहनधारकांना दिलासा ! ड्रायव्हिंग लायसन्स, RC वैधतेबाबत केंद्राची महत्वपूर्ण घोषणा

 

‘आणखी किती फेकणार मोदीजी, हद झाली राव’, काँग्रेसकडून पंतप्रधानांवर खरमरीत टीका

 

Ashok Chavan : ‘आरक्षण मर्यादेचा प्रश्न केंद्र सरकारकडून अनुत्तरीत, राज्याला सकारात्मक निकाल अपेक्षित’

 

दुर्दैवी ! फॅशन स्ट्रीटची आग विझवून घरी परतताना कॅन्टोनमेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

Related Posts