IMPIMP

Pravin Darekar | फडणवीसांना निमंत्रण नसल्याने दरेकरांचा कार्यक्रमावर बहिष्कार, म्हणाले…

by bali123
Pravin Darekar | mumbai sessions court gives relief to praveen darekar instructs mumbai police not to arrest him till monday

सरकारसत्ता ऑनलाइन Pravin Darekar | मुंबईतील एका कायर्क्रमाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निमंत्रण नाही. त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत नाही. यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) आक्षेप घेतला आहे. निमंत्रण पत्रिकेत माझ नाव आहे, मात्र फडणवीसांचे नाव नाही. त्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही, अशा आशयाचे पत्र एमएमआरडीएला (MMRDA) देत दरेकरांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.

एका विरोधी पक्षनेत्याच नाव टाकायच अन् दुसऱ्याचं नाही हे राजशिष्टाचाराला धरुन नसल्याचे दरेकरांनी पत्रात म्हटले आहे. तसेच गेल्या महिन्यातही कांदिवलीतल्या एका कार्यक्रमातही त्यांचे नाव नव्हते. मी ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून दिले होती. एखादी बाब जेव्हा वारंवार घडते, तेंव्हा जाणीवपूर्वक ती केली जाते असा अर्थ त्यातून निघतो, असे दरेकरांनी म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कलानगर जंक्शन इथल्या सागरी सेतूकडून बांद्रा कुर्ला संकुलाच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या
मार्गिकेचे लोकार्पण आणि मालाड पश्चिम इथल्या कोविड रुग्णालयाच्या हस्तांतरण सोहळ्याचा हा
कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर दरेकरांचे नाव आहे. मात्र फडणवीसांचे पत्रिकेत
नाव नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना एमएमआरडीए (MMRDA) परिसरातील पायाभूत
सुविधांशी निगडीत अनेक विकासकाम सुरु झाली.

त्यामुळे मुंबईच्या विकासासंदर्भातलं त्यांचं योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. सध्या ते
विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. एका विरोधी पक्षनेत्याचे नाव टाकायचे आणि दुसऱ्याचे
टाकायचे नाही ही बाब राजशिष्टाचाराला धरुन नाही. त्यांनी हे पत्र एमएमआरडीएचे महानगर आयुक्त
एस. व्ही. आर. श्रीनिवास यांना लिहिले आहे. यात आपण केलेली कृती उचित वाटत नाही. त्यामुळे
उद्याच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकत नसल्याचे दरेकरांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Titel : Pravin Darekar wrote a letter to mmrda chief for not coming to the inauguration program devendra fadnavis is not invited

Related Posts