IMPIMP

राज ठाकरेंचं ‘ते’ भाकीत खरं ठरणार?

by bali123
raj thackeray has made statement that inquiry by center may open new names in alleged 100 core demand

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय तपासाचे निर्देश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रीपदावरुन पायउतार झाले. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. आरोप झाल्यापासून देशमुख यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव होता. मात्र, देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे गंभीर असल्याचा ठपका उच्च न्यायालयाने ठेवत सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे raj thackeray यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारने निष्पक्ष चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरे यांनी केले होते.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला; ‘तुमची नैतिकता…’

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिले होते, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं होतं. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करुन निष्पक्ष तपास करावा, केंद्राने या प्रकरणाचा तपास केला तर फटाक्यांची माळ लागेल, असे वक्तव्य राज ठाकरे raj thackeray यांनी केले होते. आता याच वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबई पोलिस काहीच करत नव्हते; देशमुखांच्या राजीनाम्यानंतर किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते राज ठाकरे ?
अतिरेकी बॉम्ब ठेवतात, स्फोटकं ठेवतात हे आपण ऐकले होते. मात्र आता पोलिसच स्फोटकं ठेवतात हे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत. हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असून ही धक्कादायक बाब आहे. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा असल्याने त्याची राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने चौकशी होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची कसून चौकशी करायला पाहिजे, केंद्राने निष्पक्ष पणे या प्रकरणाचा तपास केला तर फटाक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, याची कल्पनाही कोणी केली नसले, असे वक्तव्य राज ठाकरे raj thackeray यांनी केले होते.

अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळून इतर सर्व दुकाने बंद – मनपा आयुक्त विक्रम कुमार

मुख्यमंत्र्यांची चौकशी होणार का ? मनसेचा सवाल
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, सीबीआयच्या तपासात फक्त गृहमंत्रीच नाही, तर मुख्यमंत्र्यांनाही बोलावलं जाईल का असा प्रश्न येतो. कारण, सर्व प्रकाराची माहिती मुख्यमंत्र्यांनाही दिली होती असं अनिल देशमुख यांनी सांगितले होते, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

अनिल देशमुख दिल्लीला रवाना
राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेणार असल्याची माहिती आहे. पुढच्या 15 दिवसात सीबीआयने प्राथमिक चौकशी पूर्ण करावी आणि त्यानंतर काय करायचं याचा निर्णय सीबीआय प्रमुखांनी घ्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

Also Read :

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

 

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Related Posts