IMPIMP

नवनीत राणांच्या आरोपांवर संजय राऊत यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

by bali123
Navneet Rana | The threat to Sanjay Raut should be investigated

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या लेटरबॉम्बमुळं राज्यासह दिल्लीतही वातावरण तापलं आहे. असं असतानाच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navaneet Rana) यांनी आरोप केला आहे की, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना खा. नवनीत राणा यांनी पत्र लिहित तसा दावा केला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र नवनीत राणांचे हे धमकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. राणा यांनी सावंत यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचंही म्हटलं आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्या महिलेनं माझ्यावरही असेच आरोप केले होते असं राऊत म्हणाले आहेत.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

‘याला गंभीर आरोप म्हणत नाहीत, त्या महिलेनं माझ्यावरसुद्धा असेच आरोप केले होते’
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत sanjay raut यांनी यावर भाष्य केलं आहे. नवनीत राणा यांनी सावंत यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणी बोलताना संजय राऊत म्हणाले, याला काही गंभीर आरोप म्हणत नाहीत. त्या महिलेनं माझ्यावरसुद्धा असेच आरोप केले होते असं संजय राऊत म्हणाले आहेत.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

काय म्हणाल्या नवनीत राणा ?
सचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठवल्यामुळं अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली अशी तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो अशा शब्दात अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

काय म्हणाले अरविंद सावंत ?
नवनीत राणा यांच्या आरोपांनंतर शिवसेनेवर टीका होत असताना अरविंद सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात तेव्हा दादा, भैया म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. परंतु धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवय आहे. मागच्या एका वर्षातील त्यांची लोकसभेतील भाषणं बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेना विरोधात त्याची बोलण्याची पद्धत, शब्द बघा तुमच्या लक्षात येईल असंही सावंत म्हणाले.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts