IMPIMP

तीरथ सिंहांच्या Ripped Jeans च्या विधानावर स्मृती इराणी भडकल्या, म्हणाल्या – ‘नेत्यांचा कायद्याशी संबंध, लोकांच्या कपड्याशी नाही’

by bali123
smriti irani on tirath singh rawats statement about ripped jeans

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी भाजपने तिरथ सिंह यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनवले. भाजपला आशा होती की ते राज्यात विकास कामांना गती देतील. मात्र, मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी महिलांच्या कपड्यावरून वादग्रस्त विधान केले. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. अशातच आता यावर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया आली आहे. स्मृती इराणी smriti irani यांनी देखील तीरथ सिंह यांनी केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

Deepali Chavan Suicide Case : चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या – ‘दीपाली वाचली असती ही आत्महत्या नाही तर…

स्मृती इराणी smriti irani म्हणाल्या, लोकांनी कशाप्रकारे कपडे घालावेत याच्यासोबत नेत्यांचे काही देणं घेणं नाही. कराण त्यांच काम धोरण बनविणे आणि कायद्याचे राज्य सुनिश्चित करणे हे आहे. काही गोष्टी पवित्र आहेत आणि त्यातीलच एक आहे महिलांनी आपलं आयुष्य जगण्याची पद्धत निवडणं. समाजासोबत जोडण्यासाठी ती जो प्रकार निवडेल तो पवित्रच आहे. नेत्यांचा या गोष्टीसोबत काहीही संबंध नाही की लोक कसे कपडे घालतात. काय खातात किंवा काय करतात. आपलं काम धोरण बनवणं आणि कायद्याचं शासन सुनिश्चित करणं आहे, अशा शब्दात त्यांनी तीरथ सिंह यांना सुनावले आहे.

Photos : श्वेता तिवारीनं ‘बोल्ड’ फोटो शेअर करत दाखवले ‘अ‍ॅब्ज’ ! चाहते म्हणाले – ‘वय जराही वाढलं नाहीये’

काय म्हणाले होते तीरथ सिंह
काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमासाठी बाहेर गेलो होतो आणि येताना विमानात माझ्या शेजारी एक महिला बसली. जेव्हा मी त्या महिलेकडे पाहिले तेव्हा तिची जीन्स गुडघ्यावर फाटलेली होती. त्या महिलेसोबत दोन लहान मुले होते. मी त्यांना विचारले कुठे जायचे आहे. त्यावर त्या महिलेने सांगितले की दिल्लीला जात आहेत. मी विचारले की पती काय करतात, त्यावर महिलेने उत्तर दिले की ते, जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत. तुम्ही काय करता असे विचारले असता, त्या महिलेने सांगितले की, एनजीओ चालवते. फाटलेली जीन्स घालणारी महिला संस्कृतीला कसा जन्म देईल आणि मुलांना काय संस्कार देईल, असे तीरथ यांनी म्हटले होते.

Also Read : 

रूपाली चाकणकरांचा परमबीर सिंहांवर निशाणा, म्हणाल्या – ‘नाव परमविरासारखं अन् संपत्ती हडपतो बकासुरासारखी’

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काल घेतली होती पत्रकार परिषद

 

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा उद्रेक ! एकाच दिवसात 59 हजार नवीन कोरोना रुग्ण, 10 दिवसात झाले दुप्पट नवे रुग्ण

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वनाधिकारी महिलेची स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या

 

BJP : महा’वसुली’ सरकारला फक्त सत्तेचीच चिंता

 

चंद्रकांत पाटलांनी केलं ReTweet ! म्हणाले – ‘अनिल देशमुखांकडून 21 तारखेलाच पत्र लिहून घेतलं गेलं अन्…’

 

मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव, 9 जणांना बाधा

Related Posts