IMPIMP

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

by bali123
Why do mp Navneet Rana and her husband Ravi Rana often criticize Shiv Sena?

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana ) यांनी आरोप केला आहे की, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना खा. नवनीत राणा यांनी पत्र लिहित तसा दावा केला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र नवनीत राणांचे हे धमकीचे आरोप फेटाळून लावले आहेत. खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती आ. रवी राणा (Ravi Rana) हे दाम्पत्य कायमच शिवेसना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असतात. सचिन वाझे प्रकरण, राज्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव अशा अनेक मुद्द्यांवरून या दाम्पत्यानं मुख्यमंत्र्यांवर सातत्यानं टीका केली आहे. हे दाम्पत्य सारखं सेनेला टार्गेट का करत असतं ? राणा दाम्पत्य आणि सेनेचा काय वाद आहे ? यावर एक नजर टाकूयात.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मातोश्रीवर धडक देण्याचा प्रयत्न
राणा दाम्पत्यानं ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं होतं. विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते मातोश्रीवर धडक देणार होते. मात्र त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. त्यामुळं त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न फसला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणं हा गुन्हा आहे का, हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न आहे असा आरोपही राणा दाम्पत्यानं केला होता.

सेना आणि राणा दाम्पत्य वाद ?
नवनीत राणा navneet rana  यांनी 2011 साली राजकारणात प्रवेश केला. 2014 साली त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक देखील लढवली. सेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणुकीपूर्वी एका टीव्हीवरील कार्यक्रमात नवनीत राणा आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार गाडगेनगर पोलिसांनी निकाली काढली होती. परंतु त्यावेळी राणा यांना कळवण्यात आलं नसल्याचं त्यांचं म्हणणं होतं. राजकीय दबावतंत्राचा वापर करत अडसूळ यांनी हे प्रकरण निकाली काढल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

यानंतर 4 जून 2018 रोजी राणा यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. हे प्रकरण निकाली लागत नाही तोच अडसूळ यांनी 2018 रोजी राणा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. 2014 साली सुरू झालेला हा वाद 2019 साली टोकाला पोहोचला जेव्हा आनंदराव अडसूळ यांनी राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरणही न्यायालयात गेलं होतं. त्यामुळं त्या कायमच शिवसेनेविरोधात तलवार घेऊन तयार असतात. त्यामुळं त्या जेव्हाही बोलायला तोंड उघडतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात काहीही बोलतात असं सेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणतात.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

काय आहे नवनीत राणा यांचा आरोप ?
सचिन वाझे प्रकरणी संसदेत आवाज उठवल्यामुळं अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली अशी तक्रार राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो अशा शब्दात अरविंद सावंत यांनी धमकी दिल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

काय म्हणाले अरविंद सावंत ?
नवनीत राणा यांच्या आरोपांनंतर शिवसेनेवर टीका होत असताना अरविंद सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, नवनीत राणा जेव्हा कधी मला संसदेत भेटतात तेव्हा दादा, भैया म्हणून हाक मारतात. मी देखील अनेकदा त्यांच्याशी बोलत असतो. काही गोष्टींच्या बाबतीत त्यांना समजावत असतो. परंतु धमकी वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्याच लोकांना धमक्या देत असतात. त्यांना राईचा पर्वत करण्याची सवय आहे. मागच्या एका वर्षातील त्यांची लोकसभेतील भाषणं बघा. विशेषत: महाराष्ट्र सरकार व शिवसेना विरोधात त्याची बोलण्याची पद्धत, शब्द बघा तुमच्या लक्षात येईल असंही सावंत म्हणाले.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts