IMPIMP

अबू आझमींचा इशारा, म्हणाले -‘आम्ही सरकारसोबत,पण जनहितासाठी आंदोलन करु’

by bali123
work government we will agitate public abu azmi warned

यवतमाळ : सरकारसत्ता ऑनलाइन – आम्ही सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनहितासाठी आंदोलन करु. शिक्षण क्षेत्रामध्ये दिल्ली सरकारने सुधारणा केली. पाणी, वीज बिलही माफ केले. मोहोल्ला क्लिनिकमधून दिल्लीकरांना दिलासा दिला. दिल्ली सरकार या सुधारणा करु शकते तर मग महाराष्ट्र सरकार का करु शकत नाही ? असा सवाल आमदार अबू आझमी abu azmi यांनी उपस्थित केला आहे. ते यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर भाष्य करताना अबू आझमी म्हणाले, मंत्र्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हाच परमबीर सिंह यांनी शरद पवार यांना माहिती का दिली नाही ? आता बदली करण्यात आल्यानंतर ते का बोलत आहेत ? सचिन वाझे सारखा लहान अधिकारी वरिष्ठांची परवानगी असल्याशिवाय कोणतेही काम करु शकत नाही. या प्रकरणाची चौकशी होत आहे. त्यापूर्वी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणे चुकीचे असल्याचे अबू आझमी abu azmi यांनी सांगितले.

अबू आझमी abu azmi यांनी पुढे सांगितले की, आम्ही सोबत राहिले म्हणून सरकार राहील अन् आम्ही विरोधात गेले म्हणून सरकार पडणार नाही. मात्र, राज्य सरकार सर्वसामान्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर आम्ही सरकार विरुद्ध निश्चितच आंदोलन करु, त्याची सुरुवात मुंबईतून होईल, असा इशारा अबू आझमी यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

केंद्राच्या कारभारावर निशाणा साधताना अबू आझमी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अंबानी आणि अदानींसाठी काम करत आहे. हम दो हमारे दो हीच त्यांची निती आहे. त्यांनी आर्थिकदृष्ट्या देश बरबाद केला आहे. 15 टक्के मुलस्लीमांकडे बोट दाखवून 85 टक्के हिंदूनं घाबरवले जात आहे. मात्र, रेल्वेचे खासगी करण केल्यानंतर मुस्लिमांचे अधिक नुकसान होणार की हिंदु कर्मचाऱ्यांचे ? म्हणूनच 85 टक्के लोकसंख्येने आता मोदी सरकारविरोधात जागृत झाले पाहिजे, असे अबू आझमी abu azmi म्हणाले.

शिक्षण पद्धतीवर बोलताना अबू आझमी म्हणाले, नव्या शिक्षण धोरणातून देखील समाजाची विभागणी करण्याचे काम सुरु होणार आहे. श्रीमंताचा मुलगा जादा पैसे भरून शिकेल, पण गरिबांच्या मुलांना प्रवेश मिळणे अवघड होणार आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने इतर बाबींवरील खर्च कमी करुन शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

Also Read:

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शून्य असल्यानं राज्यात कोरोना वाढतोय, हे सरकारचं अपयश’


‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

 

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Related Posts