IMPIMP

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शून्य असल्यानं राज्यात कोरोना वाढतोय, हे सरकारचं अपयश’

by bali123
MNS on CM Uddhav Thackeray | mns leader sandeep deshpande taunt uddhav thackeray after yogi adityanath took action on illegal mosque loudspeaker

कल्याण : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य सरकार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact Tracing) बद्दल एकदम शून्य आहे. त्यामुळं अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात झपाट्यानं कोरोना वाढत आहे. हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत मनसेचे mns आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

‘रोज कोरोना बाधितांची यादी जाहीर करावी, संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करून घेण्यास पुढं येतील’
आ. राजू पाटील म्हणाले, सुरुवातीपासून कोरोना आजाराविषयी नागरिकांमध्ये संभ्रम होता. बाधितांची नावं जाहीर केली जात नाही. मात्र आता तशी परिस्थिती नाही. सरकारनं रोजच्या रोज कोरोना बाधितांची यादी जाहीर करावी. तशा प्रकारचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात यावेत. कोरोना बाधितांची यादी जाहीर झाल्यावर त्यांच्या संपर्कात आलेले स्वत:हून कोरोना चाचणी करून घेण्यास पुढं येतील. तसंच अन्य लोकही सावध होतील असंही त्यांनी सांगितलं.

‘सरसकट सामान्य जनतेला लॉकडाऊनमध्ये ढकलण्यापेक्षा जे बाधित व संपर्कात आलेत त्यांच्यावर लक्ष द्यावं’
पुढं बोलताना राजू पाटील म्हणाले, कोरोनाची आकडेवारी येत आहे. ती खोटी की खरी याची शहानिशा होण्यास मदत होईल. कोरोना वाढतो आहे म्हणून सरसकट सामान्य जनतेला लॉकडाऊनमध्ये ढकलण्यापेक्षा जे बाधित व संपर्कात आलेले आहेत. त्यांच्यावर लक्ष देणं सोपं होईल. कोरोना आटोक्यात आणण्याची तीव्र इच्छा ठाकरे सरकारची आहे असं मानून सरकार निर्णय घेईल अशी अपेक्षा देखील पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘महापालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध बेडच्या डॅशबोर्डच्या तक्त्यात अनेक रुग्णालये माहितीच अपडेट करत नाहीत’
राजू पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महापालिका सुरुवातीला कोरोना बाधितांच्या नावासह यादी जाहीर करत होती. त्यानंतर ही यादी देणं बंद केलं. केवळ आकेडवारीच दिली जात आहे. त्याचबरोबर खाजगी रुग्णालयात बेडची कमतरता आहे. रुग्णालयात किती बेड आहेत. किती रिक्त आणि किती भरलेले आहेत याची माहिती डॅशबोर्डवर दिली गेली पाहिजे. तशी माहिती दिली जात होती. मात्र महापालिकेच्या हद्दीत कोरोनाची खासगी रुग्णालये आहेत. महापालिकेच्या वेबसाईटवर गेल्यास उपलब्ध बेडचा डॅशबोर्डचा तक्ता पाहिल्यास अनेक रुग्णालये त्यांची माहितीच अपडेट करत नसल्यानं उपलब्ध बेड किती आहेत याची माहिती मिळणं नागरिकांना कठीण झालं आहे असंही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts