IMPIMP

‘कोणाचीही गय करु नका, कोरोना निर्बंध आणखी कडक करा’ – सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

by bali123
corona infection review meeting speaker ramraje naik nimbalkar satara

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोरोनाचे कडक निर्बंध लागू करा, कोणाची गय करु नका अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर ramraje naik nimbalkar यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच आरटीपीसीआर लॅबची क्षमता वाढवून कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Devendra Fadnavis : ‘दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा’

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आज कोरोना आढावा बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर ramraje naik nimbalkar यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाला कोणाचीही गय न करता कोरोना नियमांची कडकपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार श्रीनीवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल उपस्थित होते.

‘महाविकास’ सरकार आदर्श असल्याचं राऊतांनी सांगितलं, दिला UPA ला पुन्हा सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्र सरकारप्रमाणेच…’

सभापतींनी सांगितले की, जिल्ह्यात तरुणांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. रुग्ण वाढत असल्याने रुग्णांना बेड मिळत नाहीत. तसेच रुग्णांना सहजपणे बेड उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी दिली. याशिवाय रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची जास्तीत जास्त कोरोना टेस्टींग करावी, अशा सूचना यावेळी दिली.

Tejashwi Yadav : ‘निवडणूक आयोग बरखास्त करा अन् कारभार भाजपच्या हाती द्या’

पालकमंत्र्यांनी सांगितले की, शासनाने घातलेल्या निर्बंधांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मास्क घालणार नाही अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच लग्न समारंभावर लक्ष ठेवावे. रात्री 8 नंतर 5 पेक्षा अधिक नागरिक एकत्र येणार नाहीत याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही तेथे तात्काळ कारवाई करावी, असे आदेश गृह राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत दिले.

Also Read:

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शून्य असल्यानं राज्यात कोरोना वाढतोय, हे सरकारचं अपयश’


‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

 

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Related Posts