IMPIMP

Nana Patole : ‘महाराष्ट्राला लसीची नितांत गरज; केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय’ !

by bali123
maharashtra covid situation nana patole slams modi govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लसीकरणावर भाष्य केलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये 20 ते 45 वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचं दिसून आलं आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्तानं हे तरुण बाहेर पडतात त्यामुळं कोरोनाची लागण तरुणांना जास्त होत आहे. हा धोका लक्षात घेऊन 18 वर्षांवरील सर्वांना सरसकट कोरोनाची लस द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. इतकंच नाही तर लस पुरवठ्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला कोरोना लसीची गरज असताना केंद्र सरकार पाकिस्तानला मोफत लस देतंय अशी टीका त्यांनी केली आहे.

‘महाविकास’ सरकार आदर्श असल्याचं राऊतांनी सांगितलं, दिला UPA ला पुन्हा सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्र सरकारप्रमाणेच…’

नेमकं काय म्हणाले नाना पटोले ?
लस पुरवठ्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राला कोरोना लसीची नितांत गरज असताना केंद्र सराकर मात्र अत्यल्प लस पुरवठा करत आहे. पाकिस्तानसह इतर देशांना मोफत लस देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देशात जास्त असून, परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करा अशी मागणी पटोले यांनी केली आहे. इतकंच नाही तर जनतेनंही कोरोना नियमांचं पालन करावं. मास्क वापरणं, साबणानं हात स्वच्छ धुणं आणि सोशल डिस्टेंसिंगचं पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा असं आवाहन देखील पटोले nana patole यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis : ‘दीपाली चव्हाण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा’

’18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी’
पुढं बोलताना नाना पटोले nana patole म्हणाले, राज्यात कोरोनाचं संकट वाढत आहे. दुसरीकडे लसीकरणाची मोहिमही राबवली जात आहे. 1 एप्रिलापासून 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केली, ही चांगली बाब आहे. तरी सद्यस्थितीत तरुणांमध्ये कोरोनाची लागण झपाट्यानं होत असल्याचं समोर आल्यानं वयाची अट शथिल करणं ही काळाची गरज आहे. यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी परवानगी मिळवावी आणि राज्यभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घ्यावी.

Tejashwi Yadav : ‘निवडणूक आयोग बरखास्त करा अन् कारभार भाजपच्या हाती द्या’

‘कोरोनाचा बदलेला विषाणू घातक, जितक्या झपाट्यानं बाधितांची संख्या वाढतेय त्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण झालं पाहिजे’
नाना पटोले nana patole म्हणाले, कोरोनाचा बदलेला विषाणू घातक असून, संक्रमणाचा वेगही अधिक आहे. फेब्रुवारीपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली, तेव्हापासून 20 ते 45 वयोगटातील तरुणांना याचा संसर्ग झाल्याचं पहायला मिळत आहे. नोकरी, कामानिमित्त घराबाहेर पडणारे हे तरुण घरी येऊन घरातील वयोवृद्ध, लहान मुलांमध्ये त्यांचा संसर्ग होण्याची मोठी भीती आहे. त्यामुळं आता लसीकरणासाठी 18 वर्षांवरील तरुणांना लस देणं गरजेचं आहे. या वर्गातील सर्वांना लस दिली, तर कोरोना संक्रमणाची साखळी तोडणं सोपं होईल. देशात मोठ्या  प्रमाणात लस उपलब्ध असतानाही केवळ वयाच्या अटीमुळं तरुणांना लस घेता येत नाही हे दुर्दैवी आहे. जितक्या झपाट्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्याच्यापेक्षा जास्त वेगानं लसीकरण केलं गेलं पाहिजे असा सल्ला देखील पटोले यांनी यावेळी बोलताना दिला.

Also Read:

मनसेची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले – ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शून्य असल्यानं राज्यात कोरोना वाढतोय, हे सरकारचं अपयश’


‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

 

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

Related Posts