IMPIMP

Rain in Maharashtra | आगामी 3 दिवस राज्यात जोरदार पाऊस बरसणार; पुण्यासह 7 जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी

by nagesh
Maharashtra Rains Update | heavy rainfall in vidarbha konkan weather update imd

पुणे न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –   Rain in Maharashtra | जुलै महिन्यात पावसाने रौद्र रूप धारण केलं होतं. अतिमुसळधार पावसाने (Rain) राज्यातील अनेक जिल्ह्यात दरडी कोसळल्या तर पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पाऊस गायब झाला. आणि ऑगस्ट महिन्यात प्रारंभी पावसाने जोर धरला. मात्र, आता महाराष्ट्रात मान्सूनसाठी (Rain in Maharashtra) हवामान योग्य तयार झालं आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात तुरळक पाऊस बरसला आहे. आज कोकणासह (Konkan) मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) जोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता हवामान खात्याकडून (Weather department) वर्तवण्यात आला आहे. दरम्यान अशीच स्थिती आगामी 3 दिवस राहणार असल्याचं मुंबई वेधशाळेने (Mumbai Observatory) सांगितलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

राज्यात आज कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तसेच, राज्यात (Rain in Maharashtra) आगामी 3 ते 4 दिवस कोकण मध्य महाराष्ट्र (Rain in Maharashtra) मराठवाडा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आगामी 3-4 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामुळे काही भागात अतिमुसळधार पावसाची देखील शक्यता वर्तवली आहे. अशी माहिती कुलाबा वेधशाळेच्या शुभांगी भुत्ते यांनी दिलीय.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची आस लागली होती.
त्यानंतर आता राज्यात (Rain in Maharashtra) मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झालं असून शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत.
तसेच, पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांना बुधवारी हवामान खात्याकडून (Weather department) ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे.
या दरम्यान संबंधित जिल्ह्यांत अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच, तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे.

 

Web Title : Rain in Maharashtra | weather alert heavy rain possible in maharashtra for next 3 days imd give orange alert to 7 districts including pun

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 128 नवीन रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

Afghanistan Crisis | अफगाणिस्तान सोडण्याची घाई पडली महागात, उडणार्‍या विमानातून पडले तीन लोक, टायर पकडून लटकले होते (व्हिडीओ)

Sharad Pawar | शरद पवार यांनी दिला राज ठाकरेंना ‘हा’ सल्ला

आता LPG सिलेंडरची डिलिव्हरी मिळेल पसंतीच्या वेळी! परंतु द्यावा लागेल इतक्या रुपयांपर्यंत चार्ज, बुकिंगपूर्वी जाणून घ्या नियम

Related Posts