IMPIMP

Yahoo News | Yahoo च्या न्यूज वेबसाइट्स आता भारतात करणार नाहीत काम, जाणून घ्या तुमच्या याहू अकाऊंटचे काय होणार

by nagesh
Yahoo News | yahoo shut down its news websites in india due new foreign direct investment rules

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Yahoo News | अमेरिकन वेब सर्व्हिस प्रोव्हायडर (American web service provider) याहू (Yahoo) ने गुरुवारी 26 ऑगस्टला भारतात आपल्या काही सर्व्हिस बंद केल्या (Yahoo shut down some of its services in India), ज्यामध्ये संपूर्ण देशात याहूद्वारे कंटेंटचे पब्लिकेशन (shutting down publication of content) बंद झाले आहे. मात्र टेक कंपनी वेरिझोन मीडिया (Verizon Media) च्या ओनरशिपच्या वेब पोर्टलने यूजर्सला आश्वासन दिले आहे की त्यांची याहू अकाऊंट, ई-मेल आणि सर्च एक्सप्रियन्स कोणत्याही प्रकारे प्रभावित (Yahoo News) होणार नाही (Yahoo account, e-mail and search experience will not be affected in any way).

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सरकारच्या नवीन एफडीआयचा परिणाम (due to new Foreign Direct Investment (FDI) rules)

याहूने भारतात डिजिटल कंटेंटला ऑपरेट आणि पब्लिश करणार्‍या मीडिया कंपन्यांच्या परदेशी मालकीला (foreign ownership) मर्यादित करणार्‍या नवीन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (एफडीआय) रूल्समुळे भारतात आपल्या न्यूज वेबसाइट्स बंद केल्या आहेत. यामध्ये याहू न्यूज, याहू क्रिकेट, फायनान्स, एंटरटेन्मेंट आणि मेकर्स इंडियाचा समावेश आहे.

 

याहू अकाऊंट, मेल आणि सर्च सुरू राहिल

याहू वेबसाइटने एका नोटिसमध्ये म्हटले आहे की, 26 ऑगस्ट 2021 पासून Yahoo India आता कंटेंट पब्लिश करणार नाही. तुमचे याहू अकाऊंट, मेल आणि एक्सप्रियन्स कोणत्याही प्रकारे प्रभावित होणार नाही आणि नेहमी प्रमाणे काम करेल. आम्ही तुमचा सपोर्ट आणि रिडर्सचे आभार व्यक्त करतो.

 

सर्व कंटेंटचे पब्लिकेशन बंद

याहू वेबसाइटवर विचारल्या जाणार्‍या FAQ च्या नुसार, कंपनीने संपूर्ण देशात याहूचे कंटेंट ऑपरेशन बंद करत, भारतात सर्व कंटेंटचे पब्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याहूने म्हटले, भारतात कंपनीचे ऑपरेशन देशाच्या नियामक कायद्यात नुकत्याच केलेल्या बदलामुळे प्रभावित झाले आहे, जो आता भारतात डिजिटल कंटेंट आणि पब्लिश करणार्‍या मीडिया कंपनीच्या परदेशी मालकीला मर्यादित करतो.

 

डिजिटल न्यूज मीडिया फंडिंग रूल बदलला

डिजिटल न्यूज मीडिया आऊटलेटमध्ये 26% पेक्षा जास्त परदेशी फंडिंग मर्यादित करणार्‍या नियमांत बदलामुळे वेरिझॉन मीडियाने याहू इंडियाचे ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यूएस टेक प्रमुख वेरिझॉनने 2017 मध्ये याहूचे अधिकग्रहण केले होते.

 

मीडिया बिझनेस रिस्ट्रक्चर करावा लागेल

नवीन आयटी नियमाचा अर्थ आहे की, याहू इंडियाला देशात न्यूज आणि करंट अफेयर्स बिझनेस ऑपरेट
करण्यासाठी एका ठराविक कालावधीच्या आत आपल्या संपूर्ण मीडिया बिझनेस रिस्ट्रक्चर करावा लागेल.

 

याहूने सहकार्याबद्दल दिले धन्यवाद

मागील दोन दशकांमध्ये भारतात आपल्या सर्व यूजर्सला सपोर्ट आणि विश्वासासाठी धन्यवाद देत,
याहूने म्हटले की, हे बदल याहू मेल आणि याहू सर्च प्रभावित करत नाही.
भारतात पहिल्या प्रमाणेच कोणत्याही बदलाशिवाय याहू यूजर्सला सर्व्हिस देणे सुरू ठेवणार आहे.

 

Web Title : Yahoo News | yahoo shut down its news websites in india due new foreign direct investment rules

 

हे देखील वाचा :

Pune Crime | उधार देण्यास नकार दिल्याच्या रागातून मारहाण, एकाला अटक

Pune Crime | मुलगा होत नसल्याने सासरच्यांनी केला छळ, सुनेच्या आत्महत्ये प्रकरणी 4 जणांवर FIR

ZP Pune Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे जि.प. मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

 

Related Posts