IMPIMP

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | “…म्हणून मुख्यमंत्र्यांना राज्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार नाही” – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Governor Appointed MLA | kolhapur shivsena city chief sunil modi plea set back for bjp in legislative council speaker election

जालना : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | भाजपच्यावतीने (BJP) जालना शहरातील (Jalna News)
पाणीप्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या नेतृत्वाखाली
बुधवारी ‘जलआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. त्यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली
आहे. ‘मुख्यमंत्री गाडी चालवतात आणि भगवान सरकार चालवते! भगवान भरोसे चालणारे हे सरकार असून पाण्याचा प्रश्न सोडवू न शकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना राज्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार नाही,’ असं फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जालना शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्थेसाठी आपण मुख्यमंत्री असताना 129 कोटींचा निधी दिला होता. परंतु मागील अडीच वर्षांच्या काळात ही योजना तसूभरही पुढे गेली नाही. कामांना स्थगिती देणारे आणि आमच्या कामांची उद्घाटने करणारे हे सरकार आहे. जेथे जलआक्रोश तेथे भाजप आहे.”

 

पुढे फडणवीस म्हणाले, “मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमच्या काळात तयार केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडसारख्या प्रकल्पास मागील दोन-अडीच वर्षांत राज्य सरकारने (Maharashtra State Government) एक पैसाही दिला नाही. समुद्रात वाहून जाणारे 157 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करून तसा शासन निर्णयही आमच्या काळात जाहीर केला होता. पण, राज्य सरकारने मागील अडीच वर्षांत यासाठी काहीही केले नाही. जलयुक्त शिवार सारखी योजना सध्याच्या राज्य सरकारने बंद केली. सत्ता, टक्केवारी, वसुली यामध्येच राज्यातील सत्ताधारी खूश आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

 

शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचा भाजपवर निशाणा –

“नगरपरिषद निवडणूक जवळ आली म्हणून भाजपने हा मोर्चा काढला. प्रयत्न करूनही मोठी गर्दी या मोर्चासाठी त्यांना जमवता आली नाही. पैसे देऊन मोर्चासाठी गर्दी जमविण्याचा प्रयत्न केल्याच्या ध्वनिचित्रफितीही आता समोर आल्या आहेत. जालना नगरपरिषदेच्या सत्तेसाठी भाजपचा हा खटाटोप,” असल्याचं खोतकर म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | chief minister uddhav thackeray no right called ruler criticism devendra fadnavis jalakrosh morcha in jalna

 

हे देखील वाचा :

Pune Traffic Police | पुणे शहरात आता मध्यरात्रीपर्यंत ‘सिग्नल’ सुरू राहणार

Pune Crime | कोंढाव्यात दगडाने मारहाण करुन तरुणाचा खून

Maharashtra Monsoon Rains | राज्यात ढगाळ वातावरण ! आगामी 5 दिवस काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस?

Petrol-Diesel Price Today | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

 

Related Posts