IMPIMP

आता दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेबाबतही तयार रहावं लागणार, आदित्य ठाकरेंचे मोठं विधान

by nagesh
Aaditya Thackeray | shivsena thackeray faction leader aaditya thackeray spoke about where he was when disha salian died in mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडला आहे. रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत असल्याची परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. दरम्यान, आता ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्रातील परिस्थिती स्थिर असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. तसेच रेमडेसिविरचा होत असलेला काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

आदित्य ठाकरे Aaditya Thackeray पुढे म्हणाले, केंद्रासोबत आणि काही कंपन्यांच्या सहकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रशासनानं चर्चा केली आहे. त्यामुळे आता ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता दूर झाली आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याचा विचारही केला नव्हता. आता आपल्याला तिसऱ्या लाटेबाबत देखील सतर्क रहावे लागणार असल्याचे, आदित्य ठाकरे म्हणाले.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

पाच लाखांच्या आसपास महाराष्ट्रात बेड्स
बेड्सची काय सोय केली आहे, या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे Aaditya Thackeray म्हणाले, जंबो सेंटर्स महाराष्ट्रातच सर्वात पहिले उभारण्यात आले आहेत. पाच लाखांच्या आसपास महाराष्ट्रात बेड्स तयार केले गेले आहेत. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे. उपचारात कोणत्याही प्रकरारची कमतरता दिसणार नाही कारण त्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यांच्या मतांनुसार निर्णय घेतले जात आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

तरुण निष्काळजीपणे वागत आहेत
ज्या तरुणांना कोरोना प्रसाराची भिती नाही ते निष्काळजीपणे वागत आहेत. त्यांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. पण हे सर्दी, खोकला नाही. अशी काही लोकंही पाहिली ज्यांनी चाचणी केली नाही आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हा आजार बिलकुल सहजतेने घेऊ नका. डॉक्टर आणि प्रशासनावर भरवसा ठेवावा आणि काळजी घ्यावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

पहिल्या पेक्षा आताची परिस्थिती ठीक
मागील लॉकडाऊनमध्ये अनेक प्रवासी मजूर महाराष्ट्रातून आपापल्या गावी परतले आहेत. परंतु यावेळी आम्ही ये-जा थांबवली नाही. यावेळी त्यावेळेसारखी परिस्थिती नाही. गेल्या लॉकडाऊनमधून सर्वांनी धडा घेतला आहे. आता परिस्थिती पहिल्यपेक्षा ठिक असल्याचे आदित्य ठाकरे Aaditya Thackeray म्हणाले.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

Related Posts