IMPIMP

पत्नीची हत्या करून पोलीस कंट्रोल रूमला फिल्मी स्टाईलनं केला फोन, म्हणाला…

by bali123
uttarpradesh husband kills wife in basti

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – एका पतीनं पत्नीचा खून करून फिल्मी स्टाईलनं आपल्या मेहुण्याला व्हॉट्सअॅपवरून खुनाची माहिती दिली. यानंतर पोलिसांना फोन करून हत्येची कबुली दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील uttarpradesh बस्ती जिल्ह्यातील ही घटना आहे. आरोपी पतीनं पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह खोलीत ठेवला आहे. मला पकडायला या, असं म्हणत पोलीस नियंत्रण कक्षात फोन करून हत्येची कबुली दिली. नियंत्रण कक्षातून ही माहिती कप्तानगंज पोलिसांना दिली गेली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला अटक केली.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

समोर आलेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील छपिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वीरपूर गावातील राधेश्याम पांडेय यांची मुलगी पुष्पा हिचं लग्न 4 वर्षांपूर्वी कप्तानगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नकटीदेई येथील अमरेश मिश्रा यांचा मुलगा गुरुप्रसाद मिश्रा यांच्या सोबत झालं होतं. महिलेच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पुष्पाचा पती हा हुंड्यासाठी तिचा छळ करू लागला होता. तो तिला माराहण देखील करत असे. माहेरचे लोक येऊन त्यांच्यातील वाद मिटवत असे.

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

3 दिवसांपूर्वीच पुष्पा पतीसोबत माहेरावरून सासरी आली होती. त्या दोघात भांडण झालं होतं. यानंतर पुन्हा माहेरची मंडळी आली. त्यांच्यातील वाद मिटवला आणि परत गेली.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

गुरुवारी पुष्पाला माहेरी जायचं होतं. त्याच्या आधीच्या रात्री त्या दोघात पुन्हा भांडण झालं. हा वाद विकोपाला गेला आणि पतीनं पुष्पाची हत्या केली. पत्नी पुष्पाची हत्या केल्यानंतर त्यानं मेहुण्याला याबाबतची माहिती दिली. फिल्मी स्टाईलनं पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. कप्तानगंज पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts