IMPIMP

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, महाशिवरात्रींनंतर जाणून घ्या नवे दर

by pranjalishirish
gold-price-gold-silver-prices-fall-again-find-out-rate-10-grams-after-mahashivaratri

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – दिवसेंदिवस सोन्याची झळाळी कमी होऊ लागली आहे. सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आता तरी सोन्याची Gold  घसरण कमी होताना काही दिसत नाही. महाशिवरात्रीनिमित्त बंद असलेले मल्टी कमोडिटी एक्स्चेंज शुक्रवारी सुरु होताच सोन्याच्या दरात घसरण झाली. गेल्या काही महिन्यांत सोन्याने Gold  १२ हजारांची घसरण नोंदविली आहे.

शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वर एप्रिलच्या सोन्याच्या  Gold  वायदा भावात १३८ रुपयांची घट झाली. ९.३० वाजता हा भाव ४४,७४१ रुपये प्रति ग्रॅमवर होता. तत्पूर्वी बुधवारी बाजार बंद होताना सोन्याचा हा दर ४४,८७९ रुपये प्रती १० ग्रॅम होता. एमसीएक्सवर १६९ रुपयांनी प्रति तोळा घसरले आहे. चांदीमध्येही घसरण सुरु आहे. एमसीएक्सवर चांदीच्या वायदा बाजारात ३४५ रुपयांची घसरण झाली. ९.३० वाजता चांदी ६७,२०० रुपये प्रति किलो वर खुली झाली होती. तत्पूर्वी बुधवारी बाजार बंद होताना चांदीचा दर ६७,५४५ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सध्या चांदी ६७१६० वर ट्रेड करत आहे.

सोने २२ टक्क्यांनी घसरण्याचे कारण काय?

कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या. सोन्याच्या किमतीने तर ऐतिहासिक नोंद केली होती. या काळात ५६ हजार रुपये तोळा दर गाठला होता. त्यामुळे सोने घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर सोन्याच्या किमतीही घरंगळू लागल्या.

तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून दरांत घट होण्याची काही कारणे…

कोरोनावर लस उपलब्ध झाली नव्हती, मात्र आता लस उपलब्ध झाली आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजी आली.
अमेरिकेत सरकारी बॉण्ड्सना मागणी वाढली, त्याचबरोबर अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाले. या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने लोकांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts