IMPIMP

भाजपला मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचाय : काँग्रेस खासदार

by bali123
bjp mp girish bapat demand president rule in maharashtra congress mp ravneet singh slams

नवी दिल्ली : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. त्यावरून आता काँग्रेस खासदाराने मत वक्तव्य केले आहे. ‘भाजपला मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचा आहे. पण हे खपवून घेतले जाणार नाही’, असे पंजाबमधील लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह ravneet singh यांनी सांगितले.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

लोकसभेत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा मुद्दा जोरदार गाजला. यामध्ये काही भाजप खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनीही ही मागणी केली आहे. या सर्व घडामोडींनंतर रवनीत सिंह ravneet singh म्हणाले, ‘महाराष्ट्रात इथून असे अधिकारी पाठवले जातील, तर सहन केले जाणार नाही. महाराष्ट्र खूप चांगले राज्य आहे. पण तुम्हाला (भाजपला) महाराष्ट्रही मध्यप्रदेशसारखा तोडायचा आहे. तिथले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे खपवून घेतले जाणार नाही. बाहेरच्या तपास यंत्रणांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही’.

Prakash Ambedkar : ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; पण…’

तसेच ते पुढे म्हणाले, ‘हा फार गंभीर मुद्दा आहे. ही फक्त महाराष्ट्रापुरती गोष्ट नाही. ही संपूर्ण देशातील गोष्ट असून, चिंतेची बाब आहे. आपण एकमेकांवर आरोप करून जे मूळ आरोपी असतात, जे गुन्हेगार अधिकारी असतात, ते यात वाचतात. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतात आणि गुन्हे करणारे अधिकारी बाजूला राहतात’.

Photos : ‘गंदी बात’ फेम महिमा गुप्ताच्या Hotness चा ‘कहर’ ! बिकिनीसोबतच शेअर केला ‘हा’ अवतार

आता सरकार खंडणी मागतंय : बापट
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेले आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागले आहे. म्हणजे कूंपन शेत खायला लागली आहे आणि पाण्याला तहान लागली आहे. सरकार भ्रष्ट होत चालले आहे, असे म्हणत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी राज्य सरकारवर टीका केली.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

Related Posts