IMPIMP

नाना पटोले म्हणाले, ‘मोदी लोकांना म्हणताहेत मास्क घाला अन् स्वत: मात्र…’

by Team Deccan Express
congress leader nana patole criticizes bjp leaders

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole यांनी भाष्य केले. घरातील तरुण माणसं मरताहेत आणि विरोधक राजकारणात दंग आहेत, असे ते म्हणाले.

सरकारच्या पॅकेजवरुन चंद्रकांत पाटलांची टीका, म्हणाले -‘गरीब वर्गाला मदत केल्याचा आव आणला, केलेली मदत तुटपुंजी’

राज्य सरकारने लॉकडाऊन सदृश निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावरून विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू केला. हे करताना त्यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला. मात्र, प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून त्यांनी जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असे पाटील म्हणाले होते.

फडणवीसांचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे’

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर नाना पटोले nana patole यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘घरातील माणसे मरत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते मात्र राजकारणात दंग आहे. आम्ही लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत आहोत. तर विरोधक खुर्चीसाठी राजकारण करत आहेत. मोदी हे प्रचारजीवी आहेत. ते मास्क न घालता प्रचार करत सुटले आहेत आणि लोकांना मास्क घाला म्हणून सांगत आहेत. भाजप मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खात आहे’.

Read More : 

महाराष्ट्रातच नाही तर गुजरात, उत्तर प्रदेशाकडेही पहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं

पंढरपूरमध्ये बरसले पडळकर आणि दरेकर; म्हणाले – ‘आघाडी सरकार पांढर्‍या पायाचे, बलात्कारी’

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा गंभीर इशारा, म्हणाले – ‘…याचा परिणाम संपूर्ण देशावरच होईल’

Raju Shetty : ‘जगणं-मरणं आमच्या नशीबावर सोडा, लॉकडाऊन लावू नका’

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

अनिल देशमुख यांना CBI चं समन्स, 14 एप्रिलला चौकशी

कंगना राणावत ठाकरे सरकारला म्हणाली – ‘चंगू मंगू गँग, मग ट्रोलर्सने…

चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला Lockdown वर सुचवला ‘उपाय’, म्हणाले ; ‘लॉकडाऊनऐवजी…’

Related Posts