IMPIMP

‘महाविकास’ सरकार आदर्श असल्याचं राऊतांनी सांगितलं, दिला UPA ला पुन्हा सल्ला, म्हणाले – ‘महाराष्ट्र सरकारप्रमाणेच…’

by bali123
uddhav thackeray lead maharashtra govt is ideal sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युपीए (UPA) चं नेतृत्व करावं असं म्हटलं होतं. युपीएबाबत केलेल्या या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध झाल्याचं पहायला मिळालं होतं. आता राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार हे आदर्श सरकार असल्याचं म्हणत काँग्रेसप्रणित युपीएला सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात असलेला सत्तेचा फॉर्म्युला केंद्र पातळीवर देखील युपीएनं राबवायला हवा असं ते म्हणाले आहेत. केंद्रातील काँग्रेसप्रणित युपीएला त्यांनी पुन्हा एकदा सल्ला दिला आहे.

‘महाराष्ट्रातील लोकही भारतीयच हे विसरू नका’; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला

‘महाराष्ट्र सरकार प्रमाणेच युपीएनं देश पातळीवर हा प्रयोग राबवावा’
महाराष्ट्रानं देशाला एक नवा राजकीय मार्ग दाखवला आहे असं म्हणत संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रानं देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एक नवा मार्ग दाखवला आहे. विचारसरणी वेगळी असूनही तीन वेगवेगळ्या पक्षांनी गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात आदर्श सरकार चालवलं आहे. युपीएनं हा प्रयोग देश पातळीवर राबवायला हवा. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी देखील देशातल्या 27 विरोधी पक्षांच्या नेत्यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन? CM ठाकरेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक, मोठा निर्णय होण्याची शक्यता

‘सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा’
पुढं बोलताना संजय राऊत म्हणाले, सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन चर्चा करून एका नव्या राजकीय व्यवस्थेविषयी विचारविनिमय करायला हवा. 1975 मध्ये जय प्रकाश नारायण यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणलं होतं. पण दुर्दैवानं आज तसं नेतृत्व देशात नाही असंही राऊत म्हणाले.

राज्यात पुन्हा Lockdown की कठोर निर्बंध? CM उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 pm ला जनतेला संबोधित करणार

राऊतांच्या युपीएच्या वक्तव्यावरून झाला होता वाद
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या युपीएच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीए (UPA) चं नेतृत्व करावं असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, राऊत शरद पवार साहेबांचे प्रवक्ते आहेत का. यावर पुन्हा भाष्य करत राऊत म्हणाले यूपीए हा राष्ट्रीय स्तरावरील विषय आहे. राज्य स्तरावरील, जिल्हा स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये. यावर पुन्हा नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर अस्तित्वात आलंय असं ते म्हणाले होते. राऊतांच्या वक्तव्यामुळं नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी जाहीर केली होती. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊतांची राजकारणी आणि संपादक यांच्यात गल्लत होत आहे असा टोला त्यांनी लगावला होता.

Also Read:

‘जेटली आणि सुषमा स्वराज यांचा मृत्यू मोदींनी केलेल्या छळामुळेच’ – द्रमुक नेत्याचे विधान

‘हे पाय जमीनीवरचे… मातीचा टिळा भाळी, पायात आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचं रक्त, सह्याद्रीचा हा चिरा भक्कम आहे’ ! कार्यकर्त्यांच्या शरद पवरांबद्दलच्या भावना

 

‘त्या’ विधानावरुन संजय राऊतांचा ‘यू-टर्न’, म्हणाले -‘मी तसे काही म्हणालोच नाही’


Video : किरीट सोमय्यांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप, म्हणाले-‘गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटाचा भाव’

 

‘कोरोना’चा कहर रोखण्यासाठी ठाकरे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत?

 

‘तुम्ही शरद पवारांचे प्रवक्ते आहात का?’ राऊत यांचं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले – ‘राहुल गांधींची ‘पप्पू’ म्हणून टिंगल केली, त्यावेळी ही मंडळी कुठे होती’

 

‘कोरोना’च्या नावाखाली सुरु असलेला ‘तमाशा’ बंद करा; काँग्रेसच्या नेत्याचे वक्तव्य

 

Video : …अन् व्हिडिओ पाहताना अंगावर काटा आला : डॉ. अमोल कोल्हे

 

‘हा काळ फालतू राजकारण करण्याचा नाही, लोकांचे प्राण वाचवण्यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं; कोरोना कुणालाही सोडत नाही’

Related Posts