IMPIMP

‘अब्दुल कलाम जिहादी, त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्बची माहिती दिली’; महंताचे वादग्रस्त वक्तव्य

by bali123
former president apj abdul kalam told jihadi priest ghaziabad temple

नवी दिल्ली : गाझियाबादमधील डासना देवी मंदिराचे पुजारी नरसिंहानंद सरस्वती यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम apj abdul kalam यांच्याबाबत वक्तव्य करताना ते म्हणाले, ‘अब्दुल कलाम जिहादी होते. त्यांनी अणुबॉम्बची माहिती पाकिस्तानला दिली होती’, असे विधान केले आहे. तसेच मुस्लिम हे कधीच भारताचे समर्थक असू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

राज्यात Lockdown की कडक निर्बंध? आज CM ठाकरे निर्णय घेण्याची शक्यता

नरसिंहानंद यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, ‘अब्दुल कलाम apj abdul kalam यांनी राष्ट्रपती भवनामध्ये एक विशेष विभाग तयार केला होता. त्यामध्ये कोणतीही मुस्लिम व्यक्ती आपली तक्रार दाखल करून शकत होती. तसेच कलाम हे डीआरडीओचे प्रमुख असताना त्यांनी पाकिस्तानला अणुबॉम्ब निर्मितीसंदर्भात माहिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. डॉ. कलाम यांना ‘मिसाईल मॅन’ म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचे भाषण आणि देशाप्रती केलेले कार्यामुळे ते सर्वांच्या अजूनही मनात आणि विचारात आहेत. पण आता त्यांच्याबाबतच नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच; गेल्या 24 तासांत 28,699 नवे रुग्ण, 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी गाझियाबदमध्ये मंदिरात पाणी पिल्याने एका मुस्लिम तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. नरसिंहानंद हे त्याच मंदिराचे पुजारी आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Related Posts