IMPIMP

राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच; गेल्या 24 तासांत 28,699 नवे रुग्ण, 132 कोरोनाबाधितांचा मृत्यू

by bali123
maharashtra-state-corona virus-update

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे corona थैमान अद्याप सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. गेल्या 24 तासांत 28,699 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13,165 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, यामध्ये 132 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 25,33,026 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 22,47,495 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 88.73 टक्के इतका झाला आहे. तर कोरोनाचे 2,30,641 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र, आत्तापर्यंत 53,589 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यात सध्या 11,77,265 रुग्ण होम क्वारंटाईन असून, 11,887 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबई, पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण
मुंबई, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत आत्तापर्यंत 3,69,451 जणांना कोरोनाचा corona संसर्ग झाला आहे. यामध्ये 3,30,328 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 11,604 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 26,599 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय पुण्यात आत्तापर्यंत 4,81,212 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये 4,29,355 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8218 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात सध्या 43,590 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

पावणेदोन कोटींपेक्षा अधिक चाचण्या
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आत्तापर्यंत 1,85,84,463 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी 25,33,026 चाचण्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याचे प्रमाण 13.63 टक्के इतके आहे.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts