IMPIMP

‘मुख्यमंत्र्यांनी Lockdown म्हणताच 50 रुपये किलो असणारी द्राक्षे 25 रुपयांवर आली’

by bali123
grape price goes rs 50 rs 25 soon cm announces lockdown gopichand padalkar

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि बेड कमी पडू लागले आहेत. लोक अजूनही कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. लग्न समारंभातही गर्दी होताना दिसत आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल (सोमवार दि 29 मार्च) झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरीत लावण्यात यावेत अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील विरोधी पक्षानं आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर लॉकडाऊनला आपला विरोध असल्याचं म्हटलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथील मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

राज्यात Lockdown लागणार का ? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले ‘हे’ संकेत

‘मुख्यमंत्र्यांनी नुसतं लॉकडाऊन म्हटलं तर 50 रुपये किलो असणारी द्राक्षे 25 रुपयांवर आली’
गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar म्हणाले, मुख्यमंत्री लॉकडाऊन करण्याचं सांगत आहेत. परंतु आमचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊनमुळं सर्वात जास्त नुकसान गरीब, मजूर, शेतकरी आणि कामगार वर्गांचं होतं. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले, गेल्या 15 दिवसांपासून मुख्यमंत्री लॉकडाऊन करावं लागेल, तर लॉकडाऊन करणार असं सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुसतं लॉकडाऊन म्हटलं की, शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्षांचा भाव कमी झाला. 50 रुपये किलो असणारी द्राक्षे 25 रुपयांवर आली असंही पडळकरांनी सांगितलं आहे.

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

‘… तर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही’
पुढं बोलताना गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar म्हणाले, पंढरपूर भागातील काही द्राक्ष उत्पादक शेतकरी माझ्याकडे आले होते. त्यांनी मला ही हकीकत सांगितली आहे. या पंढरपूर तालुक्यात 1 लाख टन द्राक्षे उत्पादित झाले आहेत. पुढील दीड महिन्यात या द्राक्षांची विक्री होणार आहे. परंतु अशी लॉकडाऊनची परिस्थिती आली, तर या भागातील द्राक्ष बागायतदार मोडून पडणार आहेत. गेल्या वर्षीचे पैसेच त्याला अजून नीट फेडता आले नाहीत. पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली तर येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही अशी वास्तववादी परिस्थिती पडळकर यांनी मांडली.

‘महविकास आघाडी सरकार हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांविरोधातील सरकार’
गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar असंही म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन तोडणार नसल्याचं सांगितलं. पण ऊर्जामंत्र्यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी वीजबिल भरा, अन्यथा वीज कनेक्शन तोडलं जाईल असं सांगितलं. वीज तोडणीच्या निर्णयामुळं द्राक्ष बागायतदारांसह इतरही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. महविकास आघाडी सरकार हे शेतकरी आणि कष्टकऱ्यांविरोधातील सरकार आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

 

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

 

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

 

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts