IMPIMP

पंकजा मुंडे यांना धक्का ! माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी, काही मिनिटांचं भाषणही दिलं

by bali123
Pankaja Munde vs Dhananjay Munde | BJP leader pankaja munde slams NCP minister dhanajay munde after beed district nagar panchayat election result

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शिवसेनेनं (ShivSena) सत्ताधारी भाजप (Bharatiya Janata Party – BJP) ला धक्का देत जळगाव महानगरपालिकेत (Jalgaon Municipal Corporation) भगवा फडकवला आहे. बीडमधील भाजपचे माजी आमदार व पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे निकटवर्तीय केशव आंधळे (Keshav Andhale) यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या (Nationalist Congress Party – NCP) बैठकीला हजेरी लावली. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. भाजपच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदर बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं भाजपची पिछेहाट होत असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाल्यानं चर्चेला उधाण आल्याचं दिसत आहे.

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

खास बात अशी की, या बैठकीत आंधळे यांनी 3 मिनिटांचं भषणही दिलं. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), माजी मंत्री आ. प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. संदीप क्षिरसागर, आ. बाळासाहेब आजबे आदी उपस्थित होते. त्यामुळं आता भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागले असून लवकरच ते पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

माजी आमदार केशव आंधळे हे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजुर महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते. ऊसतोड मजुरांचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. या माजी आमदारांना आपल्या गोटात सामिल करून घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला असणारी भाजपच्या माजी आमदारांची हजेरी हे त्याचं उदाहरण आहे.

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपच्या ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील भाजपला हवं तेवढं यश मिळवता आलं नाही. आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही पिछेहाट होत आहे. त्यामुळं भाजपची बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकद कमी तर होत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील या निवडणुकीचे पडसाद उमटणार असल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर सहकारी संस्थांमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी वैजनाथ बँकेच्या निवडणुका देखील या कालावधीत होणार आहेत. त्यामुळं पंकजा मुंडे यांनी यासंदर्भात काही ठोस भूमिका घेतली नाही तर भविष्यात या निवडणुका भाजपला जड जाण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

 

‘रामायण’मधील ‘राम’ अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

 

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

 

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

Related Posts