IMPIMP

परमबीर सिंगांचा आणखी एक दावा; आता घेतलं रश्मी शुक्लांचं नाव अन् म्हणाले…

by bali123
param bir singh claimed rashmi shukla also complained against anil deshmukh

नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग parambir singh यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. असे असताना परमबीर सिंग यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनाही गृहमंत्री देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची माहिती होती’.

सचिन वाझे प्रकरण : खंडणीप्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंचा हात; खासदार नवनीत राणांचा लोकसभेत आरोप

सचिन वाझे प्रकरण समोर आल्यानंतर परमबीर सिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटविण्यात आले. त्यानंतर परमबीर सिंग parambir singh यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात 130 पानांची रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांनी म्हटले की, तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची माहिती गेल्या वर्षी तत्कालीन पोलिस महासंचालकांना दिली होती. तसेच परमबीर सिंग यांनी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

HM अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे ’पावर बँक’ बनण्यामागे काय आहे ‘पॉलिटिक्स’?

दरम्यान, गृहमंत्री देशमुख यांच्या भ्रष्टाचाराच्या केलेल्या तक्रारींची प्रभावहीन, नि:पक्ष आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी या प्रकरणाची सत्यता तपासणे गरजेचे आहे. पुरावे नष्ट होण्यापूर्वी तातडीने दखल घ्यावी, असेही ते म्हणाले.

हेही वाचा

Pandharpur : अजित पवारांच्या बैठकीला सभेचे स्वरूप, पोलिसांत FIR दाखल

‘हा’ कटाचाच भाग, शिवसेनेने सांगितला घटनाक्रम !

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा नाहीच, राष्ट्रवादीने केले स्पष्ट

पंढरपूरसाठी जनतेच्या मनातीलच उमेदवार दिला आहे, अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

पंढरपूरचा उमेदवार शरद पवार ठरवतील

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे’

RJ : धान्याच्या कोठीमध्ये अडकले मुले, गुदमरून 5 जणांचा मृत्यू

राज्यात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरून संजय राऊतांनी विरोधकांना फटकारलं ! म्हणाले…

Life Without Organs : ‘या’ 8 अवयवांशिवाय देखील जगू शकतो मनुष्य, शरीराचे ‘हे’ गुपितं करतील तुम्हाला हैराण, जाणून घ्या

Related Posts