IMPIMP

‘दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी, त्यात नवीन काय’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपला टोला

by bali123
sangali news ncp leader jayant patil slammed bjp on demand for presidential rule

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्रात काहीही झाले की राष्ट्रपती राजवटीची मागणी करायची. आतापर्यंत आठ ते नऊ वेळा अशी मागणी झाली आहे. दर महिन्याला राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असते, त्यात नवीन काय, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील jayant patil यांनी भाजपला लगावला आहे.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी सापडली या प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप केले. या सर्व घटनांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या मागणीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील jayant patil यांनी भाजपला टोला लगावला आहे.

‘महाराष्ट्रात बढत्या-बदल्यांचे रॅकेट, माझ्याकडे पुरावे’; फडणवीसांचे खळबळजनक विधान

जयंत पाटील jayant patil म्हणाले, महाराष्ट्रात काहीही झाले तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येते. राज्यतल्या भाजपकडून आतापर्यंत आठ ते नऊ वेळा राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्यात आली आहे. ते महिन्यातून एक ते दोन वेळा अशी मागणी करत असतात आता त्यात काय नवीन आहे. अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवरुन टोला लगावला आहे.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर गृहमंत्री आणि मंत्रिमंडळात बदल होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही. तसेच आमच्या मनात असा कोणताही विचार नाही, असे सांगत त्यांनी गृहमंत्री बदलला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts