IMPIMP

आमदार संजय गायकवाड यांचे फडणवीसांबाबत ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य, बुलढाण्यात भाजप-शिवसेनेत तुफान राडा

by Team Deccan Express
shivsena mla sanjay gaikwad abusing devendra fadnavis bjp leaders beaten by shiv shivsena workers

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइन – बुलढाण्याचे शिवसनेचे shivsena  आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. मला जर कोरोनाचे जंतू मिळाले असते तर ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते, असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटला आहे. बुलढाण्यात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी shivsena  हल्ला केल्याची घटना आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास घडली.

बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात आज दुपारी चारच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते निषेध करण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी shivsena  त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या रोषाचा सामना करावा लागला. विजयराज शिंदे यांच्यासह तीन ते चार भाजप कर्यकर्त्यांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

शिवसैनिकांनी shivsena  आरोप केला आहे की, भाजपचे पदाधिकारी आमदार गायकवाड यांचा पुतळा जाळण्यासाठी आले होते. तेव्हा धर्मवीर आखाड्याचे अध्यक्ष तथा आमदार पुत्र कुणाल गायकवाड यांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही गटात पकडापकडी झाली. शिंदे यांना खाली पाडून त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप भाजपने केला आहे.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना वेगवेगळे केले. भाजप नेते योगेंद्र गोडे तथा विजयाबाई राठी, प्रभाकर बारे, सोनू बाहेरकर, करण बेंडवाल तसेच अनेक भाजपचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर शिवसैनिकांमध्ये श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब धुड, बंडू आसाबे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या घटनेतून शिवसेनेची दादागिरी समोर आली आहे, असे भाजपचे म्हणणे आहे.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

 

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

 

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

 

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts