IMPIMP

‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्या प्रकरणात शिवसेना लुडबुड करणार नाही’, सुत्रांची माहिती

by bali123
maharashtra will not stop so why did appointments stop mpsc student ask cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्य सरकार चांगलेच अडचणीत सापडले असताना शिवसेनेकडून shivsena मात्र सावध पवित्रा घेण्यात आला आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात शिवसेना shivsena हस्तक्षेप करणार नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. शिवसेनेने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर अजून कोणती भूमिका स्पष्ट केली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाहीत. देशमुखांचे काय करायचे याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘एका पांचट पत्रावरून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे राजीनामे घेतले तर…’

तर पवार म्हणाले होते तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा
विरोधी पक्षाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे सर्वे निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. तसेच मुख्यमंत्रीच याबाबतचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटीच्या वसुलीचा आरोप केला आहे. पण परमबीर यांनी पैसा कसा गोळा केला जातो याची माहिती दिलेली नाही. त्यानंतर देशमुखांची बाजूही आम्ही जाणून घेऊ. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

‘शरद पवारांच्या तोंडून चुकीच्या गोष्टी वदवून घेतल्या’, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

काय होता परमबीर सिंग यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या वसुलीचे आरोप केले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी आपल्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी गेल्या काही महिन्यांत वारंवार बोलावून त्यांना वसुली करण्याचे टार्गेट दिले होते. दर महिन्याला किमान १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दिले होते. असे परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंटकडून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते. परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

Also Read :

सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! वेतनात घसघशीत वाढ करुन वाढवले निवृत्तीचे वय, ‘या’ सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मोठ्या शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ ची शक्यता ?

वेळ आल्यावर ‘करेक्ट’ कार्यक्रम’ ! ‘बदलीनंतर परमबीर सिंग दिल्लीत कोणाला भेटले? – राष्ट्रवादी

‘ए भाई, तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !’ अमृता फडणवीसांचा भाई जगतापांना इशारा

बीडमध्ये NCP चा शिवसेनेला धक्का ! महत्त्वाच्या नेत्यांसह 101 प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मी नाही त्याने मला सोडले … ! सुशांतच्या मृत्यूच्या 9 महिन्यांनंतर अंकिता लोखंडेने दिली त्यांच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत !’ रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Related Posts