IMPIMP

Gold Price Today : आत्तापर्यंत 4000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या आजचा भाव

by sikandershaikh
gold silver rates today increased today 10 gram gold today rs 47415

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात (gold price) सातत्याने घसरण होत आहे. त्यानंतर आत्तापर्यंत सोन्याच्या दरात 4000 रुपयांनी घसरण झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX)सोन्याचा दर 123 रुपयांच्या वाढीसह 46,320 रुपयांवर पोहोचला आहे.

सोन्याच्या दरात 1100 रुपयांनी 2.3 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यानंतर शुक्रवारी MCX वर सोन्याचा दर 46,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरात 10 हजार रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. यापूर्वी सोन्याचा दर 56,200 रुपयांवर गेला होता.

दिल्लीत सोने-चांदीचे (gold price) आजचे दर

– 22 कॅरेट सोने – 45,420 रुपये
– 24 कॅरेट सोने – 49,450 रुपये
– चांदीचा दर – 69,000 रुपये.

पुण्यातील सोने-चांदीचा आजचा दर

– 22 कॅरेट सोने – 45,130
– 24 कॅरेट सोने – 46,130
-चांदीचा दर – 69,000 रुपये प्रतिकिलो.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात तेजी

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी पाहायला मिळाली आहे. अमेरिकेत सोन्याचा दर 1,784.54 डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. तर ऑगस्टमध्ये सोन्याचा दर 56,200 पोहोचला होता. पण ऑगस्टनंतर सोने आता स्वस्त झाले आहे.

Related Posts