IMPIMP

महिन्याला केवळ 60 रुपये खर्च ! Reliance Jio च्या ‘या’ खास प्लॅनमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड Data अन् Calling

by sikandershaikh
jio

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – टेलिकॉम कंपनी (Telecommunications Company) रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहाकांसाठी कायमच नवीन नवीन ऑफर आणत असते. पुन्हा एकदा रिलायन्स जिओनं न्यू जिओफोन 2021 ( New JioPhone 2021) ही ऑफर ग्राहकांसाठी आणली आहे.

कंपनीनं या ऑफरअंतर्गत नव्या युजर्ससाठी 1999 रुपये आणि 1499 रुपयांचे प्लॅन आणले आहेत. 749 रुपयांचा हा प्लॅन येणार आहे. हाही खास प्लॅन आहे.

याची खास बात अशी की, यात रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला पुढील वर्षभर रिचार्ज करावा लागणार नाही. जिओफोनचा या प्लॅनचा महिन्याचा खर्च फक्त 60 रुपये एवढा आहे. या प्लॅनचे काय काय फायदे आहेत याचीही माहिती आपण जाणून घेणार आहोत.

जिओफोनच्या 749 रुपयांच्या ऑफरमध्ये 12 महिन्यांसाठी अनलिमिटेड सेवा मिळणार आहे. यात युजरला 365 दिवसांसाठी फ्री व्हाईस कॉलिंगचाही फायदा मिळेल. यात दर महिन्याला 2 जीही हायस्पीड डेटा आणि त्यानंतर अनलिमिटेड असा डेटा दिला जाणार आहे. जिओची ही ऑफर 1 मार्च पासून सुरू होणार आहे. यात SMS सेवा मिळणार आहे की, नाही याची माहिती जिओनं दिलेली नाही.

रिलायन्स जिओचा जिओ फोनसाठी 1499 रुपयांचा देखील एक प्लॅन आहे. याचा मंथली खर्च फक्त 125 रुपये एवढा आहे. यात ग्राहकांना जिओफोन डिव्हाईसही मिळणार आहे. सोबतच वर्षभरासाठी मोफत कॉलिंगही मिळेल.

Related Posts