IMPIMP

चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिकांना कडक शब्दात इशारा; म्हणाले -‘केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करा’

by Team Deccan Express
bjp chandrakant patil slams maha vikas aghadi government over coronavirus

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर परिणाम झाला आहे. सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत असताना सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे आणि सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणे बंद करावे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केली आहे.

Nawab Malik : फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीसांनी वकीलपत्र घेतलं का?

नवाब मलिक यांनी आरोग्य सुविधांवरुन केंद्र सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील chandrakant patil म्हणाले, आपले अपयश लपवण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करुन कोरोनाच्या संकटापासून लक्ष विचलित करायचे, असे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे. सामान्य जनता चारीबाजूंनी संकटात असताना राज्य सरकारकडून आरोपांचे राजकारण चालू आहे. मात्र, राज्य सरकारने आता तरी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शक्ती एकवटली नाही तर राज्यातील जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

काँग्रेसच्या नेत्यानं विचारला फडणवीस अन् दरेकरांना सवाल, म्हणाले – ‘पोलीस एखाद्याला चौकशीसाठी बोलावू शकत नाहीत का?’

मलिकांचे आरोप बालिश आणि हास्यास्पद
चंद्रकांत पाटील chandrakant patil पुढे म्हणाले, नवाव मलिक यांनी रेमडेसिवीर औषधाबाबत काल केलेला आरोप बालिश आणि हास्यास्पद आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर विकण्यास 16 कंपन्यांना मनाई केली, असा धादांत असत्य आरोप त्यांनी केला. त्यासाठीचे पुरावे मागितले तर त्यांनी ते दिलेले नाहीत, असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

‘दिल्लीची हुजरेगिरी करुन महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री काय कामाचे ?’

सिद्ध करा किंवा माफी मागा
एखाद्या कंपनीने रेमडेसिवीर विकण्यासाठी गुजरात सरकारला परवानगी मागितली तर ते सरकार केवळ त्यांच्या राज्यापुरताच आदेश देऊ शकते. महाराष्ट्र सरकारनेही असाच आदेश दिला आहे, असे असताना नवाब मलिक यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या आरोपांची केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दखल घेतली आणि माहिती देण्याची विनंती केली. नवाब मलिक यांनी माहिती दिलेली नाही. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार आरोप करा आणि पळून जा, असा प्रकार चालू आहे. पण आता आम्ही हे प्रकरण धसास लावल्याशिवाय राहणार नाही. मलिक यांनी केंद्र सरकारवरील आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा अन्यथा माफी मागावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील chandrakant patil यांनी केली.

 

Also Read :

 

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

 

Pandharpur : गोपिचंद पडळकरांचा शरद पवारांवर पुन्हा घणाघात, म्हणाले…

पंढरपूर-मंगळवेढ्यात प्रचाराच्या तोफा थंडावल्या ! अखेरच्या दिवशी भाजपची एकही प्रचारसभा नाही, उद्या मतदान

 

अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना पुन्हा डिवचलं, म्हणाले -‘ चंद्रकांत पाटलांनी कधी शेती केली का ?’

 

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

 

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’


Coronavirus in India : ‘कोरोना’ने सर्वच रेकॉर्ड मोडले ! गेल्या 24 तासांत 2 लाखांहून अधिक रुग्ण, सलग दुसऱ्या दिवशी 1 हजाराहून जास्त रुग्णांचा मृत्यू

Related Posts